जुनिकामठी ला अवैद्य रेती चोरून नेताना ट्रॅक्टर ट्रॉली पकडली.

जुनिकामठी ला अवैद्य रेती चोरून नेताना ट्रॅक्टर ट्रॉली पकडली.

#) कन्हान पोलीसाची कारवाई ६ लाख ४ हजार रू चा मुद्देमाल जप्त.


कन्हान : – नदी घाटरोहणा घाटातुन अवैद्यरित्या रेती चोरून आणताना ट्रॅक्टर ट्रॉली सह आरोपीस कन्हान पोलीसांनी पकडुन १ ब्रॉश रेती, ट्रॅक्टर ट्रॉली असा एकुण ६ लाख ४ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करून कारवाई करण्यात आली.

मंगळवार (दि.११) ला सकाळी ६. ४५ वाजता परी पो उप अधिक्षक कन्हान थानेदार सुजितकुमार क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनात पोलीस कर्मचारी पेट्रो लिंग करित असताना गुप्त बातमीदाराकुन माहीती मिळाली की कन्हान नदीच्या घाटरोहणा घाटातुन लाल रंगाचे ट्रॅक्टर ट्रॉली रेती चोरून जुनिकामठी रस्त्याने कन्हान कडे आणत आहे. यावरून कन्हान पोलीसानी जुनीकामठी शिवारात नाकाबंदी करित आरोपी राजेश नवरंग सिंग वय ३४ वर्ष रा मडीबाबा खदान नं ३ हा स्वराज कंपनी चा लाल रंगाच्या ट्रॅक्टर क्र एम एच ३१ ए जी ६१८९ व ट्रॉली क्र एम एच ३१ झेड ३९५६ मध्ये विना रॉयटी कन्हान नदी घाटरोहणा घाटातुन १ ब्रॉश रेती चोरून आणताना मिळुन आल्याने त्यास विचार पुस केली असता बबलु यादव कन्हान यांचे सांगण्या वरून ही रेती चोरून आणत असल्याचे सांगितल्याने आरोपीस कन्हान पोस्टे ला आणुन सरकारी फिर्यादी वरून अप क्र १३४/२१ कलम ३७९, १०९ भादंवी नुसार आरोपी राजेश नवरंग सिंग यास अटक करून २) बबलू यादव कन्हान यांचे विरूध्द गुन्हा दाखल करून त्याच्या ताब्यातील ट्रॅक्टर, ट्रॉली किमंत ६ लाख रू. चोरीची रेती १ ब्रॉश किंमत ४ हजार रू असा एकु ण ६ लाख ४ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करून तपासात घेतला. ही कारवाई परी.पो.उप अधिक्षक कन्हान थानेदार सुजितकुमार क्षीरसागर यांच्या मार्ग दर्शनात सपोनि सतिश मेश्राम, पीएसआय जावेद शेख, एएस आय येशु जोसेफ, नापोशि कुणाल पारधी, राहुल रंगारी, पोशि शरद गिते, संजय बरोदिया, विशाल शंभरकर, मुकेश हीवाडे, मुकेश वाघाडे,सुधिर चव्हाण, चालक नापो शि संदीप गेडाम आदीने शिताफितीने करून  आरोपी स रंगेहाथ पकडुन कारवाई केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

कन्हान परिसरात १३३१२ नागरिकांना लसीकरण

Fri May 14 , 2021
कन्हान परिसरात १३३१२ नागरिकांना लसीकरण #) पारशिवनी तालुक्यात २६७१३ नागरिकांना  लसीकरण करण्यात आले #) कन्हान केंद्र १११६६ व साटक २१४६ एकुण १३३१२ नागरिकांना लसीकरण.  कन्हान : –  तालुकात लसीचा साठा  आल्याने पारशिवनी ग्रार्मिण रुग्णालया सह ग्रामीण भागातील पांच आरोग्य केन्द्र व १३ उप केंद्रां सह सर्व गावांत शिबीर लावले जात आहे. […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta