वेकोलि कामठी उपक्षेत्राने जागा देऊन नागरिकां ना स्थानतंरित करावे : माजी खासदार जाधव

वेकोलि कामठी उपक्षेत्राने जागा देऊन नागरिकां ना स्थानतंरित करावे. – माजी खासदार जाधव

#) चार नंबर, कवेलु घर, बांधा दफाई च्या नागरिकांचे पुनर्वसन करा. 

कन्हान : – वेकोलि कामठी उपक्षेत्र अंतर्गत कामठी व इंदर खुली कोळसा खदान च्या कर्मचा-यांची मोल नजुरी करून उपजिविका करण्या-या नागरिक मागील ५० वर्षापासुन वेकोलिच्या जागेत वस्ती करून राहत असल्याने कोळसा उत्खनन करण्याकरिता चार नंबर, कवेलु घर, बांधा दफाई या वस्त्यांच्या नागरिकांना योग्य जागेचे पट्टे व इमला मोहबदला देऊन टेकाडी ग्रा प परिसरात स्थानतंरित करण्यात यावे. 

          नागपुर जिल्हयात वेकोलि च्या जवळपास १३ कोळसा खाणी असुन कोळसा उत्खनन करताना या कोळसा खदान च्या कार्यप्रणाली ही परिसरातील नाग रिकांच्या दुष्टीने व्यवस्थित नसल्याने पाणी, वायु व जमिनीचे प्रदुर्शन मोठया प्रमाणात होत आहे. वेकोलि खुली कोळसा खदानचे दुषित पाणि कुठलिही प्रकिया न करता नागपुर जिल्हयाची जिवनदायी कन्हान नदीत सरळ सोडुन दुषित करण्यात येत असल्याने कन्हान नदी परिसरातील कोळसा खदान च्या पाणी, वायु व जमिनीचे प्रदुर्शना मुळे आरोग्यावर विपरित परिणाम कित्येक लोकांचे दमा, कँन्सर अश्या दुर्धर आजाराने बळी जात असल्याने आदीच नागरिक, शेतकरी व व्यावसायीक भयंकर त्रस्त असल्याने वेकोलि प्रशास ना विरोधी तिव्र रोष व्याप्त असताना चार नंबर, कवेलु घर, बांधा दफाई च्या नागरिकांचे पुनर्वसन न केल्यास परिसरातील लोकांचा सहनशक्तीचा बांध फुटु नये म्हणुन सोमवार (दि.१२) जुलै २०२१ ला माजी खास दार रामटेक मा. प्रकाश भाऊ जाधव हयांनी वेकोलि कामठी उपक्षेत्र प्रबंधक विनय कुमार हयाना भेटुन चर्चा करून आपल्या कार्यक्षेत्रातील वेकोलि कामठी व इंदर खुली कोळसा खदान च्या मध्यतंरी चार नंबर, कवेलु व बांधा दफाई येथे वेकोलि कर्मचा-यांच्या वसा हतीत घर कामे, मोलमजुरी व इतर आवश्यक हात मजुरीची कामे करित वेकोलि च्या जागेवर झोपडया, कच्चे, पक्के घरे बांधुन मागील ५० वर्ष व कित्येक वर्षा पासुन स्थायिक झाले आहे. वेकोलि ला कोळसा उत्खनन करण्याकरिता या वस्त्या हटविणे भाग आहे. परंतु महाराष्ट्र शासन नियमानुसार प्रकल्प ग्रस्ताचे  पुर्वसन करित असताना त्यांच्या अवलंबुन असणा-या बारा बलुतेदार सुध्दा सरकारी जागेवर झुग्गी झोपडी, कच्चे पक्के घरे बाधुन उपजिविका करणा-या गरिब गरजु नागरिकांना सुध्दा जमिनीचे पट्टे व मोहबदला देऊन त्यांचे सुध्दा पुनर्वसन करण्यात येते. उदा. नाग पुर जिल्हयातील गोसीखुर्द, सातगाव, बुट्टीबोरी, एम आयडीसी येथील पुनर्वसन. यानुसार वेकोलि कामठी उपक्षेत्र अंतर्गत वेकोलि जागेवर मागील ५० वर्ष व कित्येक वर्षापासुन ४ नंबर, कवेलु घर शिवमंदीर वस्ती , बांधा दफाई चे नागरिक लोकवस्ती करित असल्याने केंद्र व राज्य शासनाच्या नियमानुसार वेकोलिने या घरांचा सर्वे करून टेकाडी ग्राम पंचायत परिसरात दुस री कडे जागा उपलब्ध करून योग्य पट्टे व मोहबदला देऊन स्थानतंरित करण्यात यावे असे संबोधित करून माग णी करण्यात आली. यावेळी माजी खासदार मा. प्रकाश भाऊ जाधव, टेकाडी (को.ख) सरपंचा सुनिता मेश्राम, मोतीराम राहटे, दिलीप राईकवार, गणेश भोंगाडे, कमलसिंग यादव वेकोलि अधिकारी महारा णा, सुरक्षा अधिकारी संतोष यादव आदी प्रामुख्याने उपस्थित होते.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

समाजाकडुन पाठिवर कौतुकाची थाप

Tue Jul 13 , 2021
समाजाकडुन पाठिवर कौतुकाची थाप #) सामाजसेवक प्रशांत मसार व्दारे धर्मराज शाळे तील कोविड निराश्रित विद्यार्थी दत्तक योजनेचे कौतुक.  कन्हान : – येथील धर्मराज प्राथमिक शाळेत माणुस कीचा परिचय देत कोविड मुळे मृत्यु झालेल्या कुटुंबा तील निराश्रित बालकांना शैक्षणिक दत्तक घेण्यात येत आहे. या दत्तक योजनेचे कौतुक (दि.१३) समाजसेव क प्रशांत बाजीराव […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta