विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे प्रकाश नाईक अध्यक्ष तर रितेश पाटील उपाध्यक्ष
सावनेर: होळी चौक येथील प्राचीन पुरातन 100 वर्षांपासूनचे असलेले विख्यात विठ्ठल रुख्मिनी मंदिराचा अध्यक्ष पदी प्रकाश नाईक, तर उपाध्यक्षपदी रितेश पाटील यांची नियुक्ती झाली.
स्थानिक पुरातन विठ्ठल रुख्मिनी देवस्थान हे शहरातील एकमेव जागरूक मंदिर आहे.यामंदिराला अंदाजे 7 ते 8 एकर ओलतिची शेती एका भविकाने 100 वर्षाआधी दान केली होती.आज या शेतीला करोडो रुपयांची किंमत असून देवस्थान कमिटीचे माजी अध्यक्ष सुभाषराव नाईक उपाध्यक्ष विनायकराव पाटील, सामाजिक कार्यक्रते व मंदिर कमिटीचे सदस्य अरविंद नाईक यांनी येणाऱ्या ठेक्याचा पैसापासून जिंर्ण मंदिराचा जीर्णोद्धार केला.मंदिरात टिनाचे शेड होते ठीक ठिकानी पाणी गळत असून मंदिर परिसरात मादक सेवकांचा धुमाकूळ वाढला होता.अश्या जीर्ण मंदिराची कायापालट करून एक सुंदर रूप या मंदिराला आज प्राप्त झाल्याने सावनेर नगरीसह तालुक्यातील भाविकांनी कमिटीचे कौतुक केले.
मंदिर कमिटीचा अध्यक्ष पदी प्रकाश नाईक तर उपाध्यक्ष पदी रितेश पाटील यांची नियुक्ती झाल्याबद्दल याप्रसंगी जगनाडे पथसंस्थेचे उपाध्यक्ष डॉ.प्रा.योगेश पाटील, राम गणेश गडकरी महाविद्यालयाचे सचिव प्रा.विजय टेकाडे,माजी नगरसेवक निलेश पटे, माजी नगरसेवक लक्ष्मीकांत दिवटे, माजी नगरसेवक सुनील चाफेकर,संत सीताराम महाराज देवस्थानाचे सचिव शंकरराव आगलावे, कमलाकर खोंडेकर, मनोज अंतुरकर, धीरज अंतुरकर,अतुल पाटील,सावनेर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष कीशोर धुंढेले, व मा.राज्याचे माजी मंत्री सुनीलबाबू केदार यांनी शुभेच्छा दिल्या.
“कलंक” शब्दप्रयोग केल्याने भाजपा कार्यकर्ते आक्रमक ठाकरे विरुद्ध कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचा आरोप कन्हान,ता.१२ जुलै उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कलंक शब्दप्रयोग केल्याने शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विरुद्ध तारसा रोड, चौकात भाजपच्यावतीने नारे लाऊन निषेध आंदोलन करण्यात आले. उद्धव ठाकरे यांनी सोमवारी शिवसैनिकांच्या मेळाव्यात देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्रीना उद्देशून “नागपूरचा कलंक” […]