सावनेर येथे युवकांची हत्या कि आत्महत्या
सावनेर:-नजीक असलेल्या वेकोली येथे लाल कॉलनी मध्ये राहत असलेल्या विशाल धर्मेंद्र भारती हा काल रात्री पासून घरून गेला होता वडिलांनी विशाल ला कॉल केले असता विशाल बाहेरून जेवण करून येतो बाबा अस म्हटले…
आज दि.12 नोव्हेंबर ला विशाल धर्मेंद्र भारती वय 26 यांचा मृतदेह आढळुन आला हेटी आर टी ओ चौकी च्या सिमेंट रोड बायपास च्या उड्डाण पुला खाली विशाल चा मृतदेह तेथुन जाणार्यांना आढळला. लगेच सावनेर पोलिसांना सूचना दिली असता बातमी शहरात सोशल मीडिया च्या माध्यमातून वाऱ्या सारखी पसरली .
पोलिसांनी घटना स्थळ गाठून पंचनामा करून मृतकाचे शव शवविच्छेदन करिता सावनेर येथे हलविण्यात आले .तरुणाची हत्या कि आत्महत्या हे संशयास्पद असून सावनेर पो.स्टे. ठानेदार अशोक कोळी व त्यांचा पोलीस स्टाफ तपास करीत आहे .
विशाल ला पुलावरून ढकलून त्याची हत्या अथवा त्यांनी स्वतःच आत्महत्या केली हे मात्र पोलीस तपासात निष्पन्न होईल याकडे पोलिसांनी आपले चक्रसुत्र फिरवायला सुरुवात केली आहे.