प्रार्थना व जन्मोत्सवाचे आयोजन*
ब्रह्मलिन प.प.भैय्याजी महाराज यांचा ११४ वा जयंती व ६० वा प्रार्थना महोत्सव सावनेर तालुक्यातील सावंगी येथे हजारो अनुयायांच्या उपस्थितीत संपन्न होणार.*
सावनेर- मकर संक्रांतीच्या शुभमुहूर्तावर 15 जानेवारी रोजी सावंगी येथील श्री ताज आनंदाश्रमात ब्रह्मलीन परमपूजनीय भैय्याजी महाराज यांच्या जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. प.पू भैय्याजी महाराज यांच्या द्वारे रचीत “अध्यात्मपर प्रार्थना स्त्रोत्रावर” ह.भ.प. आचार्य डॉ. जोत्सनाताई पाटणकर(रत्नागिरी ) यांचे प्रवचन आयोजित करण्यात आले आहे.
सूफी संत बाबा ताजुद्दीन औलिया, शफी बाबा, संत गाडगे महाराज, अनुसया माता आदींच्या उपस्थितीने पावन झालेल्या या पवन स्थळी नागपूर, छिंदवाडा जिल्ह्यातील तसेच संपूर्ण विदर्भातील भाविक मकर संक्रांतीनिमित्त तीन दिवसीय भव्य जत्रेसाठी गर्दी करतात. पवित्र ताज आश्रम सावंगी.संपूर्ण गावाला जत्रेचे स्वरूप आले.आश्रमात येणाऱ्या सर्व भाविकांची भोजन,निवास व महाप्रसादाची व्यवस्था ताज आनंदाश्रम समितीतर्फे श्रीमती शालिनीताई बुधोलिया व आश्रमाच्या अध्यक्षा श्रीमती वु्षाली मुदगल व विश्वस्त मंडळी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमात ताज आनंदाश्रम तर्फे दुरदुरुन पोहचलेल्या अनुयायांसाठी व भाविकांसाठी भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात येत असुन.या भव्य यात्रा कार्यक्रमात सावनेर पोलीस स्टेशनचे रवींद्र मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येत असल्याने कोणताही अनुचित प्रकारावर आळा असतो, तसेच राम गणेश गडकरी महाविद्यालयाच्या NSS, सुमारे 50 विद्यार्थी विद्यार्थ्यांनीनी आपली सेवा देऊन भाविकांना दर्शन करण्यात महत्वाची भूमिका बजावता.
या भव्य आयोजनाच्या यशस्वीतेसाठी ताज आनंदाश्रमाचे समीर दंदे, प्रणाली दंदे, पवन जमादार, रुपाली जमादार, गजु माजर,जगदीश पाटील, भुषन सवाईकर,श्रीपाद जोशी परिश्रम घेत आहेत.