वराडा शेतशिवारात बिबटया च्या हल्ल्यात २ म्हशीचे वासरू ठार.
#) सहा गावच्या शेत शिवारात बिबटयाच्या ११ वेळा हल्यात १४ प्राळीव प्राणी ठार तर ५ जख्मी.
कन्हान : – पारशिवनी तालुकातील मौजा वराडा गाव च्या शेत शिवारात बिबटयाने चौथ्यां हल्ला करून दोन म्हशीच्या वासरू (वगार) ठार केली असुन आता पर्यंत ५ प्राळीव जनावरे कारवड ठार केले. तर एक वासरू जख्मी केले. असे आता पर्यंत परिसरातील ११ घटनेत जर्शी कारवड- ६, गोरा- २, म्हशीचे वासरू- २, बकरी – ३, कुत्रा- १ असे १४ प्राळीव जनावराना ठार केले तर ५ जनावरांना जख्मी केल्याने पेंच व कन्हान नदी काठावरील घाटरोहणा, जुनिकामठी, गाडेघाट, पिपरी, टेकाडी, वराडा, एसंबा, वाघोली नांदगाव, बखारी, गोंडेगाव कोळसा खदान व जवळपास च्या परिसरात पुनःश्च भयंकर भीतीचे वातावरण निर्माण होत ग्रामस्था मध्ये रोष व्यापत झाल्याने वनविभागाने युध्दस्तरावर बिबटयास पकडुन परिसरातील ग्रामस्था ना दिलासा देण्याची मागणी करण्यात येत आहे.
पेच व्याघ्र प्रकल्पाच्या रामटेक वन परिक्षेत्र अंतर्गत पटगोवारी रेंज मधिल वराडा येथील शेतकरी श्री नथुजी घोडमारे यांचे मालकी शेत गोठयात शुक्रवार (दि.११) फेब्रुवारी ला रात्री ८ ते १० पाळीव जनावरे आपल्या शेत गोठयात बाधुन आपल्या घरी आले. नेहमी प्रमाणे शनिवार (दि.१२) ला सकाळी शेतात गेले असता गोठयात एका म्हशीच्या वासरा ला आणि दुस-या म्हशी च्या वासरा ला बाजुच्या झाडीत नेऊन बिबटयाने खाल्ले असे दोन म्हशीच्या वासरा ठार केल्याचे दिसल्याने ग्रामस्थाच्या मदतीने वनविभाग पटगोवारी वनरक्षक श्री एस जी टेकाम ला भ्रमणध्वनीने माहीती दिली. तात्काळ वनरक्षक एस जे टेकाम यांनी घटनेची माहीती आपले प्रभारी वरिष्ठ अधिका री वन क्षेत्र सहायक भोंगाडे साहेबाना देऊन वरिष्ठाचे आदेशाने वन कर्मी ला सोबत घेऊन पोहचुन घटना स्थळाचे निरिक्षण करून पंच १) कुणाल प्रकाश देऊळकर २) अतुल धोंडबाजी चरडे दोन्ही राह. वराडा या पंचाचे साहयाने पंचनामा करून अहवाल वनविभागाचे श्रेत्र सहायक अधिकारी भोंगाडे याना दिला. गावकरी नागीरक व पिडित शेतकरी पशु मालक नथुजी घोडमारे टिकाराम घोडमारे यांची एक दोन वर्षाची व एक तीन वर्षाची अश्या दोन म्हशीचे वासरे ठार केल्याने पशु मालक नथुजी घोडमारे यांचे ५० हजार रूपयांचे नुकसान झाल्याने गावातील नागरिक व पिडीत शेतकरी यांनी वनरक्षक श्रीकांत टेकाम याचेशी चर्चा करून मृत म्हशीच्या वासराची नुकसान भरपाई म्हणुन शासना कडुन ५० हजार रूपये आर्थिक सहाय्यता त्वरित मिळवुन दयावी अशी मागणी केली.
पशुपालकाना आर्थिक साहय करून बिबटयाचा बंदोबस्त करावा.- सरपंच विद्या दिलीप चिखले
मागील दिड महिन्या वराडा शेत शिवारात बिबटयाने चारदा केलल्या हल्यात ३ जर्शी कारवड, २ म्हशीचे वासरू ठार, १ वासरू जख्मी असे आता पर्यत परिसरातील बिबटयाच्या १२ हल्यात ६ गाव चे २ गोरे, ६ जर्शी कारवड, २ म्हशीचे वासरू, ३ बकरी, १ कुत्रा असे १४ प्राळीव प्राणी ठार तर ५ जख्मी केल्याने पशुपालक शेतक-यांचे भंयकर नुकसान झाल्याने शासनाने नुकसान भरपाई म्हणुन आर्थिक सहाय्य करण्यात यावे. तसेच या बिबटया पासुन ग्रामस्थाच्या जिवितास सुध्दा धोका निर्माण निर्माण झाल्याने या बिबटयास वनविभागाने पकडुन घनदाट वनात नेऊन सोडुन परिसरातील ग्रामस्थाना दिलासा दयावा. असे सरपंच विद्या दिलीप चिखले हयानी मागणी केली आहे.