पारशिवनी तालुकयातील कोरोणा रूग्‍णांसाठी कोविड सेंटर : आमदार अँड. आशिष जैस्वाल

*पारशिवनी तालुकयातील कोरोणा रूग्‍णांसाठी आमदार अँड आशिष जैस्वाल यांचे पुढाकाराने होणार कोविड सेंटर  

कमलसिह यादव
पारशिवनी तालुका प्रतिनिधी,

वसतिगृहाची पाहणी करताना आमदार आशिष जयस्वाल

*पारशिवनी*(ता प्र):-पारशिवनी तालुकयातील वाढती कोरोना रूग्‍ण संख्‍या व वाढता मृत्‍युदर लक्षात घेता ज्‍या आरोग्‍य विषयक समस्‍या निर्माण झाल्‍या आहेत त्‍यावर मात करण्‍यासाठी पाराशीवनी नगर पंचायत शाहरातिल व शेजारच्‍या गावात ग्रामिण भागातिल साठी पाराशीवनी या ठिकाणचे कोरोना हॉस्‍पीटल्‍स रूग्‍णांसाठी उपलब्‍ध करण्‍याच्‍या दृष्‍टीने रामटेक आमदार अँड आशीष जैस्वाल यांनी संबंधित आधिकारीशी चर्चा करावी अशी मागणी पारशिवनीकर यांनी केली होती त्यावर आमदार अँड आशिष जैस्वाल यानी भरघोष प्रयत्न केले.
पाराशिवनी तालुक्यात कोरोना रूग्‍णांची संख्‍या वेगाने वाढत आहे. या ठिकाणी सा-या व्‍यवस्‍था कोलमडुन गेल्‍या आहेत. इंजेक्‍शन्‍स मिळत नसुन आवश्‍यक इंजेक्‍शन्‍सची टंचाई निर्माण झाली आहे. ग्रामिण रुगण्यात बेडस् उपलब्‍ध नाही, पेशंटना दवाखान्‍या बाहेर तास बाहेर उभे राहावे लागत आहे, खाजगी दवाखान्‍यां मध्‍ये सुध्‍दा बेडस् उपलब्‍ध्‍ा नाही.

एकुणच चिंताजनक अवस्‍था पराशीवनी येथे निर्माण झाली आहे. म़त्‍युदर वाढत चालला असुन
प्रशासन व आरोग्‍य विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे.
सध्या कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेने रौद्र रूप धारण केले असून याचे पडसाद पाराशिवनी तालुका शहर, ग्रामीण भागातही सर्वत्र दिसून येत आहे. पारशिवनी तालुक्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता पारशिवनी येथे नागारीकाची अत्यंत गरजु मागणी नुसार आमदार_अँड.आशिष जयस्वाल_यांनी स्वतः पुढाकाराने पारीशवनी येथिल मागासवर्गीय मुलांचे शासकीय वस्तिगृह, येथे लवकरच पारशिवनी तालुक्यातील कोविड रुग्णासाठी कोविड केयर सेंटर लवकरच पारशिवनीकरा साठी उपलब्ध करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

अँड. सुलेखाताई कुंभारे यांनी केले महामानव परमपुज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

Wed Apr 14 , 2021
**डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक व संशोधन केंद्र येथे अँड. सुलेखाताई कुंभारे यांनी केले महामानव परमपुज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन* **विश्वविख्यात ड्रैगन पैलेस टेम्पल येथे विशेष बुध्द वंदना संपन्न.* कामठी : महामानव परमपुज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130 व्या जयंती निमित्त दिनांक 14 एप्रील 2021 रोजी सकाळी 10:00 वाजता कामठी येथील […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta