**डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक व संशोधन केंद्र येथे अँड. सुलेखाताई कुंभारे यांनी केले महामानव परमपुज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन*
**विश्वविख्यात ड्रैगन पैलेस टेम्पल येथे विशेष बुध्द वंदना संपन्न.*
कामठी : महामानव परमपुज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130 व्या जयंती निमित्त दिनांक 14 एप्रील 2021 रोजी सकाळी 10:00 वाजता कामठी येथील विश्वविॆख्यात ड्रैगन पैलेस टेम्पल परिसरात असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक व संशोधन केंद्र येथील परमपुज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृति पुतळयाला मा. अँड. सुलेखाताई कुंभारे यांच्या हस्ते माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.
तत्पुर्वी विश्वविख्यात ड्रैगन पैलेस टेम्पल येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त पुज्यनिय भिक्षु संघाच्या उपस्थितीत विशेष बुध्द वंदना घेण्यात आली.
वर्तमान परिस्थितित कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे संस्थेच्या मोजक्या पदाधिकारी व कर्मचा-यांच्या उपस्थितीत वरील कार्यक्रम संपन्न झाले.
या प्रसंगी छावनी परिषद कामठी चे माजी उपाध्यक्ष दिपक सिरीया, नगरसेवक चंदु लांजेवार, नगरसेविका सावला सिंगाडे, सुभाष सोमकुवर, उदास बंसोड, दिपंकर गणविर, गणेश सेंगर, सागर भावे, मयुर पाटील, राजेश गजभिये, शिवपाल यादव, मनोहर गणविर, शालिकराम अडकने, विलास बंसोड, अंकुश बांबोर्डे, सुनिल वानखेडे, चंदू कापसे, भिमराव आळे, सचिन नेवारे, विनय बांबोर्डे, विजय अलोने, मोतिराम वंजारी, रोशन वंजारी, शोयेब खान, सुकेशीनी मुरारकर, वंदना आळे, विशाखा पाटील, निशा फुलझेले, वैशाली अढाऊ ईत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.