मनोरूग्ण महिलेच्या मदतीला धावले कन्हान चा रजनीश व सावनेर चा मानवदुत हितेश बन्सोड
# ) ” मेल्यावर खांदा देण्यापेक्षा जिवंतपणी मदतीचा हात द्या.”
कन्हान : – पोलीस स्टेशन परिसरात तीन दिवसापासुन असलेली निराधार मनोरूग्ण महिलेस बघुन रंजनीश (बाळा) मेश्राम यांनी ती तुमसर देवाळीची असल्यांची खात्रीशीर माहीती काढुन हितज्योती आधार फाऊंडेशन सावनेर चे हितेशदादा बन्सोड ला फोन करून बोलावुन कन्हान पोस्टे ला महिलेस योग्य आधार देण्याचे लेखी लिहुन देऊन तिला सावनेरला नेऊन तिची परिस्थिती व्यवस्थित करून तिला कायम स्वरूपी सेवा संकल्प आश्रम बुलढाणा येथे ठेऊन दर महिन्यांचा खर्च संस्थे मार्फत प्रफुलभाऊ कापसे करणार आहेत. या मनोरूग्ण महिलेच्या मदतीला रंजनीश मेश्राम व हितेश बन्सोड हयांनी धावुन मानवदुताचे मौलिक कार्य केले.
बुधवार (दि.१२) मे ला सायंकाळी ७.४५ वाजता दरम्यान परिवेक्षाधिन पो.उपअधिक्षक मा.सुजितकुमार क्षीरसागर साहेबांनी कन्हान थानेदार म्हणुन चांगली कामगिरी बजावल्या बद्दल कन्हानचे सामाजिक कार्यकर्ते रंजनीश (बाळा) मेश्राम हयांनी शुभेच्छा देऊन बाहेर निघुन मित्राशी गप्पा गोष्टी करून मित्र घरी गेले असता श्री हनुमान मंदीर परिसरात एक महिला चुप चाप बसलेली दिसल्याने रंजनीश मेश्राम ने विचारपुस केली असता साध नाव न सांगु शकणारी महिलेस दिदी म्हणताच तिने आठवण करित तुटक शब्दात तुमसर-देवाळी सांगितल्याने तेथील पोलीस स्टेशन ला फोन करून वॉटशॉप वर तिचा फोटो पाठवुन मिसिंग रिपोट असल्याची व तिचे आता कोणीही येणार नसल्याची खात्रीशीर माहीती होताच सामाजिक कार्यकर्ता रजनीश मेश्राम यांनी हितज्योती आधार फाउंडेशन सावनेर हे अपघातग्रस्त, निराधार, बेवारस, अनाथ, अपंग, मनोरुग्ण लोकांची सेवा कार्य करणा-या संस्थेचे हितेश दादा बन्सोड याना फोनवर संपर्क केला. असता काही वेळाने रात्री ११ वाजता दरम्यान हितेश बन्सोड आपल्या एका मित्रासह चारचाकी वाहनाने कन्हान पोलीस स्टेशनला पोहचुन त्या महिलेस तिच्या गावच्या पोलीस स्टेशन मार्फत घरी पोहचुन देण्याची विनंती केली असता तुमसर देवाळी पोलीस स्टेशनशी कन्हान पोलीस स्टेशनचे डिवटी अधिकारी पीएसआय अंबार्ते हयांनी संपर्क केला परंतु तिला कोणी घरी नेणार नसल्याची माहीती मिळाल्याने आता काय करायच म्हटल्यावर हितेशनी म्हटले की माझी संस्था अश्या निराधार लोंकाची सेवा कार्य करते आम्ही तिला सावनेर ला आश्रमात नेऊन परिस्थिती सुधार करून तिला आधार मिळवुन देऊ असे हमी पत्र कन्हान पोलीस स्टेशन लिहुन दिले. तेव्हा मनोरूग्ण महिलेस हितेश बन्सोड च्या स्वाधिन केले. यावेळी पोसहा.नि अंबार्ते, पोशि संदीप गेडाम, दोन महिला पोलीस कन्हान देशोन्नती पत्रकार मोतीराम रहाटे, हितेश बन्सोड, तुषार महल्ले, रंजनिश मेश्राम, सोनु मसराम आदी प्रामुख्याने उपस्थित होते. रात्री १.३० वाजता दरम्यान सावनेर ला पोहचुन तिला व्यवस्थित स्वच्छ करून जेवण देऊन आराम करू दिला.
गुरूवार (दि.१३) ला रंजनिश वामण मेश्राम हयांनी हितेश दादा बन्सोड शी फोनवर माहीती घेतली असता हितेश बन्सोड हयानी सांगितले की. या महिलेचे नाव शितल गोयल असुन तुमसर देवाळी च्या चांगल्या घर ची आहे.तिचे एम कॉम पर्यंत शिक्षण झाले असुन वडिल रिक्षावाला म्हणुन प्रसिध्द, आई च्या मुत्युने जास्त मनोरूग्ण झाल्याने घरून निघुन गेलेली आहे. हीला सध्या कुठलाही आधार नसल्याने हितज्योती आधार फाऊंडेशन सावनेर च्या सेवा कार्याने आरटीपीसीआर व इतर वैद्यकीय तपासणी करून व्यवस्थित करून कायम स्वरूपी सेवा संकल्प आश्रम बुलढाणा जिल्हा येथे ठेऊन तिचा प्रत्येक महिन्याचा खर्च सावनेर चे समाजसेवक प्रफुल भाऊ कापसे करणार आहेत.
समाजसेवक प्रफुलभाऊ कापसे
” मेल्यावर खांदा देण्यापेक्षा जिवंतपणी मदती चा हात द्या.” ” मानवता माझा धर्म, ना जात ना पात”. या मानवतेच्या उदांत प्रेरणेने प्रेरित हितज्योती आधार फाऊंडेशन सावनेर चे निरंतर अपघातग्रस्त, निराधार, बेवारस, अनाथ, अपंग, मनोरुग्ण लोकां च्या नि:स्वार्थ सेवा करण्यास कधीही सावनेरचे हितेश बन्सोड मो न ७८८८१६१६३३ व कन्हानचे रंजनिश मेश्राम मो न ८०८७७७२३७६ यांचेशी संपर्क करावा असे आवाहन हितेश बन्सोड यांनी केले आहे.