भव्य रक्तदान व कोरोना बुस्टर डोज शिबीर

भव्य रक्तदान व कोरोना बुस्टर डोज शिबीर

कन्हान,ता.14 ऑगस्ट 

   विदर्भ भुमिपुत्र संघटन कन्हान व्दारे ७५ व्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्य सोमवार (दि.१५) ऑगस्ट २०२२ ला सकाळी ९.३० ते दुपारी १ वाजे. पर्यंत तारसा रोड चौक महाकाली कॉम्पलेक्स कन्हान येथे भव्य रक्तदान व कोरोना बुस्टर डोज शिबीरांचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीरात इंदिरा गांधी शासकिय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय रक्त पेढी नागपुर, प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान तसेच तपस्या फाऊंडेशन रामटेक, एम.सी.एम. संविधानिक हक्क संघटन कन्हान, शिवराय ग्रुप खंडाळा यांचे विशेष सहकार्य लाभणार आहे. ७५ व्या भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्य कन्हान परिसरातील नवयुवकांनी रक्तदान करावे, तसेच १८ वर्षा वरील युवक नागरिकांनी स्वत:चा मोबाईल, आधार कार्ड सोबत आणुन बुस्टर डोज घेऊन रक्दान व बुस्टर डोज शिबीराचा मोठया संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन विदर्भ भुमिपुत्र संघटन कन्हान अध्यक्ष शिवशंकर (चिंटु) वाकुडकर यांनी  केले आहे. शिबीराच्या यशस्विते करिता रजनिश मेश्राम, समशेर पुरवले, सुनिल लक्षणे, भरत चकोले, आकाश नारनवरे, सोनु मसराम, हरिष तिडके, रामभैया थवानी, दिपक कुंभलकर, आशिष वानखेडे, शैलेश ढोके, मयुर माटे, मृणाल सरोजकर श्रीकृष्णा माकडे, विक्की उके, किशोर नांदुरकर, पंकज रामटेके, अनिल हटवार, शरद दुधपचारे, राजु चोपकर, जगन कारेमोरे, राधेशाम राऊत, अनिकेत नानोटे, मनोज बैठवार, पवन ठाकुर, करण पाली, सचिन कटरे, राकेश वानखेडे आदी परिश्रम करित आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

कसे घडणार 'निपुन' बालक 

Sun Aug 14 , 2022
  कसे घडणार ‘निपुन’ बालक पुरेसे शिक्षक द्या, शिक्षकांना शिकवु द्या.   स्वाक्षरी अभियानांतर्गत स्वाक्षरी घेतांना जिल्हा प्रवक्ते अशोक डोंगरे कन्हान,ता.14 ऑगस्ट       केंद्रशासन नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राबविताना इयत्ता तिसरी पर्यंत च्या बालकाला पाया भुत साक्षरता व संख्याज्ञान कौशल्य प्रत्येक बालकाने अवगत करावे अशी अपेक्षा केलेली आहे. […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta