धर्मराज विद्यालयात स्वातंत्र्याचा “अमृत महोत्सव”
कन्हान,ता.14 ऑगस्ट
धर्मराज विद्यालय व विज्ञान कनिष्ठ महा विद्यालय कांन्द्री- कन्हान आणि पोलीस स्टेशन कन्हान यांच्या संयुक्त विद्यमाने (दि.९) ऑगस्ट पासुन सुरू झालेल्या “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” निमित्य विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरण सोहळा संताजी सभागृहात संपन्न झाला.
याप्रसंगी प्रमुख अथिती म्हणुन उपविभागीय पोलीस अधिकारी कामठी विभाग एम.एम.बागबान, सहाय्यक पोलीस निरीक्षक, सहाय्यक सायबर सेल नागपुर ग्रामिण रवी म्हसकर, सहाय्यक सायबर सेल व महिला पोलीस उपनिरीक्षक कुमुदिनी पाथोडे, पोलीस निरीक्षक विलास काळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पराग फुलझेले, प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक रमेश साखरकर यांनी भुषविले. सर्व प्रथम शाळेचे मुख्याध्यापक रमेश साखरकर आणि अनिल सारवे यांनी ध्वजारोहन करून भारत मातेच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. हरित सेना द्वारे अनिल सारवे यांच्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांनी शाळेच्या परिसरातील सर्व झाडांना आणि सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्याना राख्या बांधण्यात आल्या.
कार्यक्रमाची सुरूवात संगीत शिक्षक नरेंद्र कडवे यांच्या मार्गदर्शनात “वंदे मातरम्” या गीताने करण्यात आली. “हर घर तिरंगा” या उपक्रमाबद्दल उपविभागीय पोलीस अधिकारी कामठी विभाग एम.एम. बागवान यांनी मार्गदर्शन केले तसेच सायबर क्राईम गुड – ब्याडटच या बद्दल कुमुदिनी पाथोडे व वाहतुक सुरक्षा या बद्दलची माहिती रवी म्हसकर यांनी विद्यार्थ्यांस दिली. विविध स्पर्धां-स्वच्छता अभियान, व्यसनमुक्ती, निबंध, चित्रकला, वक्रुत्त्व, कथा-कथन, हँड मेड राखी तयार करणे , क्रीडा, राष्ट्रीय गीत गायन ई.स्पर्धेतील प्रथम, द्वितीय , तृतिय विजयी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या शुभ हस्ते बक्षिसे देण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन अनिल सारवे, प्रास्ताविक वाचन मोहन भेलकर व आभार सुनील लाडेकर यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रम यशस्वी करण्या करिता उपमुख्याध्यापिका संध्या तिळगुळे, प्राथमिक चे मुख्याध्यापक खिमेश बढीये, पोलीस विभागातील सहाय्यक फौजदार शालिकराम महाजन, विना राऊत ,रजनी जवने, आतिश मानवटकर, पोलीस कर्मचारी वर्ग, क्रीडा शिक्षक हरीश केवटे, विलास डाखोळे, उदय भस्मे, शिवचरन फंदे, हरीश पोटभरे, सचिन गेडाम, विजय पारधी, प्रणाली खन्ते, यशोदा गेडाम, अनिल मंगर, प्रकाश डुकरे, रजुसिंग राठोड, धर्मेन्द्र रामटेके, संतोष गोन्नाडे आदीनी प्रयत्न केले यावेळेस मोठ्या संख्येत विद्यार्थी, पालक व शिक्षक उपस्थित होते.
Post Views: 1,046
Sun Aug 14 , 2022
आदर्श हायस्कुल द्वारे स्वातंत्र्याचा “अमृत महोत्सव” निमित्य मिरवणुक वृक्ष व पोलीस अधिकारी, कर्मचा-याना राखी बांधुन रक्षाबंधन उत्सव साजरा. कन्हान,ता.14 ऑगस्ट आदर्श हायस्कुल द्वारे भारतीय स्वातंत्र्या चा अमृत महोत्सवा निमित्य तारसा रोड चौक ते गांधी चौक, पोलीस स्टेशन पर्यंत मिरवणुक काढुन महात्मा गांधी च्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करित विनम्र […]