आदर्श हायस्कुल द्वारे स्वातंत्र्याचा “अमृत महोत्सव” निमित्य मिरवणुक
वृक्ष व पोलीस अधिकारी, कर्मचा-याना राखी बांधुन रक्षाबंधन उत्सव साजरा.
कन्हान,ता.14 ऑगस्ट
आदर्श हायस्कुल द्वारे भारतीय स्वातंत्र्या चा अमृत महोत्सवा निमित्य तारसा रोड चौक ते गांधी चौक, पोलीस स्टेशन पर्यंत मिरवणुक काढुन महात्मा गांधी च्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करित विनम्र अभिवादन करून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवातील रक्षा बंधानाच्या दिवसी पोलीस बांधवांना राखी बांधुन रक्षा बंधन उत्सव ही थाटात साजरा करण्यात आला.
भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा निमित्य देशात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करित गुरूवार (दि.११) ऑगस्ट ला आदर्श हायस्कुल कन्हान द्वारे शाळेच्या मुख्याध्यापिका चंद्रकला मेश्राम यांच्या हस्ते भारत माता व सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पुजन करून तारसा रोड चौक ते गांधी चौक पोलीस स्टेशन कन्हान पर्यंत विद्यार्थी, शिक्षकांनी तिरंगा झेंडा उंचावत ” भारत माता की जय ” चा जय घोष करित मिरवणुक काढण्यात आली. महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला संस्थेचे सचिव भरत सावळे यांच्या हस्ते पुष्पहार माल्यार्पण करित विनम्र अभिवादन करण्यात आले. तदंतर पोलीस स्टेशन येथे शाळेतील विद्यार्थांना गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक यशवंत कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत पोलीस हवालदार जयलाल सहारे यांनी बंदुक, रायफल शस्त्रा बद्दल माहिती देत मार्गदर्शन केले. रक्षाबंधन उत्सवा निनित्य आदर्श हायस्कुल येथील विद्यार्थीनी वृक्ष संवर्धनास परिसरातील वृक्षाला आणि आपले रक्षणाचे कार्य करणा-या पोलीस अधिकारी, कर्मचा-यांना राखी बांधली.
पोलीस स्टेशन ते परताना प्राथमिक आरोग्य केंद्र पटागंणातील वृक्षाला राखी बांधुन मिरवणुक आर्दश हायस्कुल ला पोहचुन कार्यक्रमाचे समापन करण्यात आले. याप्रसंगी आर्दश हायस्कुलचे शिक्षक जी.डी.यादव, एम.एस डोंगरे, टी.आर.चवरे, एस.एस.सोलंकी, बी.टी.गेहाणी, प्रिती बोपचे, रेणुका वर्मा, एस.एम.पेटकर, एस.डी.वंजारी, ए.के.नेवारे, अनिता हारगुडे सह विद्यार्थी बहु संख्येने उपस्थित होते.
Post Views: 1,098
Sun Aug 14 , 2022
गहुहिवरा शेतातील साळे चार लाखाचे साहित्य चोरी कन्हान,ता.14 ऑगस्ट पोलीस स्टेशन अंतर्गत मौजा गहुहिवरा शेत शिवारातील प्रतिक संगीतराय यांच्या शेतातुन अज्ञात चोरट्यांनी एकुण ४,५०,००० रुपयांचे गोडाऊन बांधकामाच्या लोखंडी साहित्य चोरून नेल्याने संगीतराय यांच्या तक्रारी वरून अज्ञात आरोपी विरुद्ध पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. शुक्रवार (दि.१२) ऑगस्ट […]