*टेकाडी (को ख)ग्राम पंचायत येथे धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त कार्यक्रम संपन्न*
पाराशिवनी(ता प्र) :- पाराशिवनी तालुकातिल टेकाडी (को ख)ग्राम पंचायत येथे धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य साधून ग्रां पं कार्यालयात टेकाडी(को ख) सरपंच च्या वतीने धम्मवंदना ने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संपूर्ण मानव जातीला विकासाच्या मुख्य प्रवाहात व उध्यारासाठी मानव मुक्तीचा मार्ग म्हणून 14 ऑक्टोबर 1956 सांली बौद्ध धम्माची दीक्षा देऊन मानसिक गुलामगिरीतून मुक्त करून त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पवित्र बुद्ध धम्माची दीक्षा दिली तो दिन संपूर्ण भारत देशात व संपूर्ण जगात एक रक्त विरहित क्रांती व मानव मुक्तीचा लढा ठरला. त्या दिवसाचे स्मरण म्हणून आज ग्रा पं येथे सरपंच सुनिता मेश्राम चे हस्ते धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे आयोजन करण्यात आले.
सर्वप्रथम महाकारूणीक तथागत भगवान गौतम बुद्ध व बोधिसत्व परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना अभिवादन करून पुष्पमाला अर्पण करून कार्यक्रम करण्यात आले. व त्यानंतर लगेच बौद्ध वंदना घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
covid-19 चा प्रादुर्भाव लक्षात घेऊन “दो गज की दुरी, मास्क है जरूरी” ने अंतर राखून टेकाडी (को ख) ग्राम पंचायत येथे धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त कार्यक्रम पार पडला.
या प्रसंगी कार्यक्रमाला गावातील सरपंचा सुनिता पृथ्वीराज मेश्राम, ,ग्रा पं सदस्य अरूण सुर्यवंशी ग्रा पं कर्मचारी , गाबतील नागरिक बांधव तसेच शरीरिक अंतर राखून उपस्थित होते .