तहसिलदार चैताली दराडे यांची पत्रकार परीषद
व्यापा-यांची वर्ग , शासकिय ,निमशासकिय,कर्मचारी यांची होणार कोरोना चाचणी
सावनेर : मा. जिलाधिकारी, नागपूर यांच्या निर्देशाप्रमाणे तहसिलदार सावनेर यांच्या दालनात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत तीन मुद्दे उपस्थित करण्यात आले.यात दिवसेंदिवस वाढत असलेल्या कोरोना रूग्नांच्या संख्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी शासनाद्वारे भाजीवाले, किराणा दुकानदार, मेडिकल स्टोरअर्स, दुधववाले, उपहार गृह, हॉटेल, घरकाम करणा-या महिला,इत्यादींची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. या संदर्भाने त्यांच्या संघटनेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची बैठक दिनांक 16 फेब्रुवारी मंगळवार रोजी सकाळी 11 वाजता घेण्यात येणार आहे. तसेच एमआयडीसी व मार्केट कमिटी याचे अधिकारी यांची बैठक घेण्यात येऊन कोरोना सदर्भाने कामगारांचे कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. कोरोना चाचणी दरम्यान रूग्ण आढळल्यास कंटेन्टमेंटझोन चा परीसर वाढविण्यात येणार आहे. तसेच मंगल कार्यालय येथे आयोजित लग्नकार्यात कोरोना संमंधाने प्रतिबंधात्मक उपाय योजनांचे उल्लंघन झाल्यास मंगल कार्यालय मालका विरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात येऊन ७ दिवसांचे बंदीचे आदेश करण्यात येतील. जे नागरिक कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे उल्लंघन करतांना आढळतील त्यांचेवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
मतदार यादीसाठी फोटो आवश्यक
निवडणूक संदर्भाने सावनेर तालुक्यात एकूण 2359 मतदार हे RESIDUAL VOTERS आहेत. म्हणजे ज्यांचे मतदार यादीत नाव आहे परंतु छायाचित्र नाही. अश्या मतदारांसंदर्भाने वी.एल.ओ.घरोघरी भेटी देत असून फोटो गोळा करण्याचे काम सुरू आहे. जे मतदार स्थलांतरित आहेत अश्या मतदारांसंदर्भाने पंचनामे करण्यात येत आहे. अशा पंचनामा केलेल्या मतदारांचे नावाची यादी प्रसिद्ध करण्यात येऊन त्यांचे नाव मतदार यादीतून वगळण्याचे कारवाई करण्यात येईल. त्यामुळे सावनेर मधील मतदारांना आवाहन करण्यात आले की, त्यांनी आपले फोटो वी.एल.ओ. कडे अथवा तहसिल कार्यालय सावनेर येथे जमा करावा.
सावनेर तालुक्यातील रेती घाटासंबंधीत
शेतात रेती साठा आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येईल.
रेतीघाट सावनेर तालुक्यातील 17 पैकी 9 रेती घाटांचे लिलाव 17.60 कोटीला झाले आहेत. सद्यस्थितीत सावनेर तालुक्यातील शेतीत वा ईतरत्र अवैधरित्या रतीसाठा केलेला आढळून आल्यास सदर रेतीसाठा ज्यांचे जमिनीत असेल त्याचेवरही कठोर कारवाही करण्यात येणार असल्याचे तहसिलदार चैताली दराडे यांनी पत्रकार परीषदेत सांगितले आहे.