वराडा ला ३५ रूग्ण आढळुन कोरोना हॉटस्पाट 

वराडा ला ३५ रूग्ण आढळुन कोरोना हॉटस्पाट 

#) वराडा गावात एकुण ८९ कोरोना बाधित. 


कन्हान : – प्राथमिक आरोग्य केंद्र साटक अंतर्गत उप केंद्र वराडा गावात (दि.१२) ला १६ रूग्ण आढळल्याने (दि.१३) मार्च ला शिबीर लावुन रॅपेट ८२ चाचणीत २३ रूग्ण आढळले तर कन्हान व खाजगीतुन ३ आज (दि.१५) ला रॅपेट ८० व स्वॅब ८० चाचणी घेण्यात आल्या यात रॅपेट ८० तपासणीत वराडा चे ३५ रूग्ण आढळुन वराडा गावात ५४ + ३५ असे ८९ कोरोना बाघित असुन वराडा कोरोना हॉटस्पाट होत आहे. 

       प्राथमिक आरोग्य केंदाचे उपकेंद्र असलेले वराडा गावात ३१ डिसेंबंर २०२० ला २० रूग्ण असुन साटक केंद्रात७८ रूग्ण संख्या होती. ४ मार्च २०२१ ला वराडा २ रूग्ण आढळुन २२ रूग्ण तर साटक केंद्र ८६ रूग्ण संख्या होती.(दि.८) मार्च ला गावच्या सरपंचा सह दोन असे तीन रूग्ण व (दि.९) च्या स्वॅब चाचणीत एक महि ला ग्रा प सदस्या असे वराडा एकुण ३१ रूग्ण संख्या झाली. (दि ११) ३३ संख्या असुन शुक्रवार ला वराडा येथील ४९ तपासणीत १६ रूग्ण आढळुन ४९ रूग्ण तर साटक केंद्र १३१ रूग्ण संख्या झाली होती. शनिवा र (दि.१३) मार्च ला ग्राम पंचायत भवनात प्राथमिक आरोग्य केंद्र साटक व्दारे शिबीर लावुन रॅपेट ८२, स्वॅब ९७ एकुण १७९ चाचणी घेण्यात आल्या यात रॅपेट ८२ तपास़णीत वराडा चे २३ रूग्ण आढळुन वराडा एकुण ७२ रूग्ण तर साटक केंद्र १५४ रूग्ण संख्या झाली आहे. कन्हान व खाजगी तपासणीत ३ रूग्ण आणि सोमवार (दि.१५) ला रॅपेट ८० व स्वॅब ४५ असे १२५ तपासणी करण्यात आल्या. यात रॅपेट ८० तपासणीत ३५ रूग्ण आढळुन वराडा एकुण ११० रूग्ण संख्या झाली असुन २० रूग्ण बरे झाले ८९ रूग्ण बाधित तर २ मुत्युची नोंद आहे. वराडा गावात आज (दि.१५) ला सध्या ८९ रूग्ण बाधित असल्याने वराडा गाव हॉटस्पा ट झाले आहे.           

    प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉ प्रज्ञा आगरे आरोग्य   टेक्नीशियन शालीकराम ऊईके, सायली शेळकी,  आरोग्य परिवक्षक अशोक सोनटक्के, दामोधर ठोंबरे,  नंदकिशोर डोईफोडे, मंगेश खोडे, उषा चव्हाण, प्रेरणा घोटेकर, कल्पना निमकर, सिंधुताई वाढई, शांताबाई धुर्वे आदी रूग्णाच्या सेवेत परिश्रम करित आहेत. ग्राम पंचायत व्दारे फवारणी करून सॅनिटायझेशन करण्या त आले.  

          पारशिवनी तहसिलदार वरूणकुमार सहारे, तालुका कोरोना विभाग प्रमुख डॉ अन्सारी हयानी गावात भेट देऊन गाव बंदी करण्यात आली. गावक-याना आपली व कुंटुबाची काळजी घेत केरोना प्रति बंधात्मक उपाय योजना नियमाची काटेकोर पणे पालन करण्याचे आवाहन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

सोशल माध्यमात अभ्रद भाषेचा वापर केल्याने गुन्हा दाखल

Tue Mar 16 , 2021
सोशल माध्यमात अभ्रद भाषेचा वापर केल्याने गुन्हा दाखल कन्हान ता. 15 मार्च कन्हान पिपरी नगर परिषद द्वारे कन्हान शहरात स्वच्छता सार्वजनिक बांधकामाला विरोध दर्शवत हिंदू धर्माला ठेस पोहचेल अशी सोशल माध्यमात अभद्र भाषेचा वापर केल्याने न.प.अध्यक्ष सौ.करूणाताई अनिल आष्टणकर व शिवसेना पदाधिकारी यांनी कन्हान पोलिस स्टेशनला ठाणेदाराला निवेदन देऊन कारवाई […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta