पेंच तोतलाडोह व नवेगाव खैरी धरणांचे दरवाजे उघडले
जिल्हयात मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट
कन्हान, ता.१५
पारशिवनी तालुक्यातील नवेगाव खैरी पेंच धरणातील जलसाठ्यात दिवसेंदिवस वाढ होत असुन आज (दि.१५) शुक्रवार रोजी दुपारी १ वाजता धरणात एकुण १०० % टक्के जलसाठा झाल्याने दुपारी १ वाजता धरणाचे सर्व १६ वक्रद्वार उघडण्यात आले. सायंकाळी ५ वाजता नवेगाव धरणाचे सर्व १६ दरवाजे २ मी ने उघडण्यात आले असल्याने पेंच व कन्हान नदी काठालगत नागरिकांना सावधतेचा इशारा देण्यात आला आहे.
मागील काही दिवसा पासुन पावसाने विश्राम घेतला होता. बुधवार रात्री पासुन मध्यप्रदेशात पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. सतत होत असलेल्या पावसामुळे चौराई धरणाचे गेट उघडल्याने तोतलाडोह धरणातील जलसाठ्यात वाढ होत पेंच तोतलाडोह व नवेगाव खैरी धरण पूर्ण १००% भरले. तोतला डोह धरणाचे १४ पैकी १० दरवाजे ०.४ मी तर नवेगाव खैरी धरणाचे १६ दरवाजे पैकीं १२ दरवाजे ०.५० मी ने तर ४ दरवाजे १.०० मी. ने उघडुन त्या मधून १०५५.०४० क्युमेक्स पाण्याचा विसर्ग पेंच नदीमध्ये सुरू होता.
धरणाच्या सुरक्षेच्या दुष्टीने सायंकाळी ५.४५ वाजता नवेगाव धरणाचे ८ दरवाजे २ मी व ८ दरवाजे २.५० मी ने उघडण्यात येऊन त्यातुन ३४४८. १६० क्युमेक्स पाण्याचा विसर्ग पेंच, कन्हान नदीत सोडण्यात येत आहे. सोडणारा विसर्ग कमी जास्त करण्यात येऊ शकतो. सध्या आज (दि.१५) ला सकाळ पर्यंत पारशिवनी तालुक्यात एकुण ८५३.७५ मिमी पाऊत झाला. यात पारशिवनी मंडळात ६४.२ मिमि, कन्हान येथे ३४.० मि.मी., आमडी येथे ४७.१ मिमी तर नवेगाव खैरी येथे सर्वात जास्त म्हणजे ८१.० मिमी पाऊस झाला आहे. आज सुद्धा पाऊस सुरु असल्याने पेंच व कन्हान नदी पात्राच्या जलसाठ्यात वाढ होण्याची शक्यता वाढली असुन नागरिकांनी नदी पात्रा जवळ जाणे टाळावे, नदी काठच्या गावांना तसेच नदी पात्रातुन आवागमन करणाऱ्या सर्व संबंधितांनी स्वतः ची काळजी घ्यावी असा सतर्कतेचा ईशारा देण्यात आला आहे. तसेच नागरिकांनी नदी पात्र ओलांडु नये, शेतीची अवजारे नदी पात्रात ठेऊ नये, जनावरांना नदी पात्र ओलांडु देऊ नये असे एन एस सावरकर उपविभागीय अभियंता, रंजीत दुसावार तहसिलदार, व्हि डी दुपारे पेंच पाटबंधारे विभाग अभियंता, सुरज शेडें तालुका कृर्षी अधिकारी, सुभाष जाधव पंचायत समिती बिडीओ पारशिवनी यांनी सर्व संबंधित कर्मचारी यांना सुचना करून परिसरातील शेतकरी व नागरिकांना सावध राहण्याचे कडकडीचे आवाहन करण्यात आले आहे.
Post Views: 827
Sun Sep 17 , 2023
पेंच धरणांचे दरवाजे उघडल्याने नदीला पुर परिस्थितीने शेतीचे नुकसान पेंच व कन्हान नदीला पुर काही गावात पाणी शिरले, संपर्क तुटला कन्हान, ता.१६ सप्टेंबर तोतलाडोह चे १४ व नवेगाव खैरी धरणा चे १६ दरवाजे उघडुन पेंच नदी व्दारे कन्हान नदीत पाण्याचा विसर्ग सोडल्याने नदीचे दोन्ही किणारे भरून वाहुन पुरपरिस्थिती […]