कन्हान ला पं जवाहरलाल नेहरू यांची जयंती ‘बालकदिवस ‘ म्हणुन साजरा
पं.नेहरू विद्यालय व भारतरत्न इंदिरा गांधी कनिष्ठ महाविद्यालय कन्हान.
कन्हान : – स्वातंत्र भारत देशाचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहर लाल नेहरू यांची १३२ वी जयंती ‘ बालकदिवस ‘ म्हणुन पंडित जवाहरलाल नेहरू विद्या लय व भारतरत्न इंदिरा गांधी कनिष्ठ महाविद्यालय कन्हान यांच्या सयुक्त विद्यमाने थाटात साजरी करण्या त आली.
रविवार (दि.१४) नोव्हेंबर २०२१ ला विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री एम पी आस्टकर यांच्या अध्यक्षेत व जेष्ट शिक्षक टी सी खंडाईत, सौ पुष्पा कुणाल कोल्हे यांच्या हस्ते पं. जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण व दिप प्रज्वलित करून बालकदिवस कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. यावेळी प्रा श्री खानजोडे सर हयानी देशाचे पहिले पंतप्रधान पं नेहरू यांच्या जीवनावर प्रकाश टाकीत मार्गदर्शन केले. कार्य क्रमाचे सुत्रसंचालन श्री टी सी खंडाईत सर हयानी तर आभार क.महाविद्यालयाचे लिपीक श्री रतन रेखाते यानी आभार व्यकत केले. विद्यालय व कनिष्ठ महावि द्यालयाचे शिक्षक, प्राध्यापक आणि कर्मचारी प्रामुख्या ने उपस्थित राहुन बालकदिवस थाटात साजरा करण्या त आला.
सार्वजनिक वाचनालय हनुमान नगर कन्हान
कन्हान : – सार्वजनिक वाचनालय हनुमान नगर येथे स्वातंत्र्य भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची १३२ वी जयंती ‘ बालकदिवस ‘ म्हणुन साजरी करण्यात आली.
सार्वजनिक वाचनालय हनुमान नगर कन्हान येथे सकाळी १० वाजता पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेस कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री वासुदेवराव चिकटे , प्रमुख अतिथी श्री एन के खनजोडे गुरुजी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण व दिप प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. संस्थेचे सचिव श्री मनोहर कोल्हे, रोशन तांडेकर, कु कृष्णाली कोल्हे आदीने पं. जवाहरलाल नेहरू यांच्या जीवनावर उपस्थितांना मार्ग दर्शन केले. कार्यक्रमास उपस्थित सर्व नागरिकांनी पं जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करून विनम्र अभिवादन करीत बालक दिवस थाटात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ग्रंथपाल श्याम बारई यांनी तर आभार कृणाल कोल्हे यांनी मानले. याप्रसंगी अभिषेक निमजे, रोशन तांडेकर, उदय पाटील, नैतिक खंडाईत, कस्तुरी कोल्हे, शुभम शेंडे सह नागरिकांना अल्पोहार वितरित करून कार्य क्रमाची सांगता करण्यात आली.