अखेर गोळीबार प्रकरणात वेकोलि सुरक्षा कर्मचारी चा उपचार दरम्यान मृत्यु
वेकोलि सुरक्षा रक्षक मिलींद खोब्रागडे
कन्हान,ता.१५ डिसेंबर
कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत खदान नंबर सहा येथे इंदिर काॅलरी मॅनेजर कार्यालयाच्या मागे भर दिवसा दोन आरोपींनी वाद विवाद करुन वेकोली च्या सुरक्षा कर्मचाऱ्यावर गोळ्या झाडुन त्याला गंभीर जख्मी केले. उपचार करिता कामठी येथील आशा हाॅस्पीटल येथे भर्ती केले असता सुरक्षा कर्मचारी चा उपचारा दरम्यान मृत्यु झाल्याने वेकोलि सुरक्षा कर्मचाऱ्यांना मध्ये शोक चे वातावरण निर्माण झाले आहे .
मिळालेल्या माहिती नुसार रविवार (दि.११) डिसेंबर रोजी दुपारी ४ वा. च्या दरम्यान महा.सुरक्षा रक्षक मिलिंद खोब्रागडे वेकोलि इंदर खुली खदान नं.६ येथील मँनेजर रूमच्या मागे कोल डेपो व वजन काटयाजवळ पेट्रोलिंग करित होता. त्याचा मागे थोड्या अंतरावर महेश वामनरावजी नासरे (वय ३४) सब एरीया ऑफिस काॅलोनी खदान नं ३ सह राहुल बेलखुडे व शमीक असे तीघे पेट्रोलिंग करीत होते. यावेळी आरोपी समीर सिद्दीकी व राहुल जेकब हे होंडा सीडी डिलेक्स क्रमांक एम.एच.४० आर ६२७२ दुचाकी ने मॅनेजर रूम मागुन प्रतिबंधित क्षेत्रात कोल डेपो कडे जात असल्याने मिलींद खोब्रागडे याने त्यांना पुढे जाण्यास मनाई केली. त्या दोघांनी मिलींद खोब्रागडे शासकीय कर्तव्य बजावित असतांना, त्याचा सोबत शिविगाळ करून धक्काबुक्की केली. आरोपी समीर सिद्दीकी याने त्याचा जवळील देशी माऊजर काढुन मिलींद खोब्रागडे च्या दिशेने जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने दोन गोळ्या झाडुन कमरे वर मारल्याने तो खाली पडल्यावर त्याच्या डोक्यावर तिसरी गोळी मारून गंभीर जखमी केले.
काही वेळातच महेश नासरे यांनी लगेच ऑफिस मधील गार्ड सोनु देविया यास बोलावुन ऑफिस च्या गाडीने मिलींद खोब्रागडे ला गाडीत टाकुन उपचारा करीता जे.एन दवाखाना कांद्री-कन्हान येथे नेले. डॉक्टरांनी प्रथम उपचार करून त्यास रेफर केल्याने खाजगी आशा हॉस्पीटल कामठी येथे दाखल केले होते. सोमवार (दि.१२) ला मिलींद याची शस्त्रक्रिया करून गोळी काढण्यात आली. पुढील उपचार सुरू असुन मिलींद सध्या ही झुंज देत असल्याने प्रकृती चिंताजनक असल्याचे बोलल्या जात होते. बुधवार (दि .१४) ला रात्री च्या दरम्यान कामठी येथील आशा हाॅस्पीटल येथे वेकोलि सुरक्षा कर्मचारी मिलिंद खोब्रागडे चा उपचारा दरम्यान मृत्यु झाल्याने वेकोलि सुरक्षा कर्मचाऱ्यान मध्ये शोक चे वातावरण निर्माण झाले आहे. सदर प्रकरणी स्थानिय गुन्हे अन्वयेशन शाखा नागपुर ग्रामीण पथक व कन्हान पोलीसांनी आरोपी समीर सिद्धिकी व राहुल जेकब यांस ताब्यात घेऊन फिर्यादी महेश नासरे यांचा तक्रारी वरून कन्हान पोलीसांनी पोस्टे ला दोन्ही आरोपी विरुद्ध कलम ३०७ , ३५३ भादंवी ३/२५ ऑर्म अँक्ट अन्वये गुन्हा दाखल केला आहे. हत्येचा गुन्हा दाखल होण्याची शक्यता वाढली आहे.
सोमवार (दि.१२) कामठी न्यायालयात हजर केले असता मा. न्यायाधिशांनी दोन्ही आरोपी चा तीन दिवसाचा म्हणजे गुरुवार (दि.१५) पर्यंत कन्हान पोलीसांना पुढील तपासा करिता पीसीआर दिला आहे.
Post Views: 417
Fri Dec 16 , 2022
सालवा येथे अज्ञात व्यक्तीचा रेल्वे अपघातात मृत्यु कन्हान,ता.१५ डिसेंबर कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत सालवा रेल्वे पटरीवर अनोळखी व्यक्तीचा रेल्वे अपघातात मृत्यु झाल्याने पोलीसांनी सुधीर मसराम यांच्या तक्रारी वरून गुन्हा दाखल केला आहे. सोमवार (दि-१२) डिसेंबर रोजी सायं.च्या दरम्यान सुधीर श्यामराव मसराम (वय -५६) रा.गणेश नगर, कन्हान यांनी सालवा […]