* श्रीराम जन्मभूमी जमीन विवाद आंदोलनात योगदान
*महाआरती व निधी संकलन कार्यालयाचे उदघाटन
कन्हान ता.16
श्रीराम जन्मभूमी मंदिर निर्माण व गृहसंपर्क अभियान समिती कन्हान यांच्या वतीने दि.15 जानेवारी शुक्रवार रोजी सांयकाळी तारसा रोड चौक,कन्हान येथे भव्य महाआरती व निधी संकलन कार्यालयाचे उदघाटन आयोजित करण्यात आले होये.या कार्यक्रमात प्रमुख मान्यवरांच्या हस्ते प्रभू श्रीरामचंद्रांच्या प्रतिमेला माल्यार्पण, दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.
या कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून ग्रीनर फाउंडेशन,नागपूरचे संस्थापक अध्यक्ष श्री सचिनजी नायडू प्रमुख वक्ते राष्ट्रीय सेवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत बौद्धिक प्रमुख मास्तर श्री उल्हासजी इटनकर व या प्रभू श्रीराम जन्मभूमी मंदिर निर्माण समितीचे अभियान प्रमुख विश्व हिंदू परिषदेचे राजेशजी पिल्ले प्रामुख्याने लाभले होते. या कार्यक्रमात ज्यांनी कार सेवेत अयोध्याला जाऊन आपले विशेष योगदान श्रीराम जन्मभूमी जमीन विवाद आंदोलनात दिले होते अशा कारसेवकांच्या भगवा दुपट्टा घालून सत्कार करण्यात आला कारसेवकांमध्ये श्री योगेशजी वाडीभस्मे, श्री अविनाश जी कांबळे,स्वर्गीय ज्ञानेश्वरजी पुंड(पुत्र सुहासजी पुंड),स्वर्गीय संजयजी पवार(पुत्र उज्वलजी पवार) श्री.खंदारेजी, श्री.राजेंद्रजी बेले या कारसेवकांचा सत्कार करण्यात आला.त्याचप्रमाणे या कार्यक्रमाच्यात उपस्थित जनसमूहास अयोध्येत साकार होणाऱ्या भव्य दिव्य अशा प्रभू श्रीराम जन्मभूमी मंदिर बांधकामाकरिता घराघरातून आर्थिक रुपी मदत संपूर्ण देशाच्या माध्यमातून व्हावी असे आव्हान प्रमुख वक्त्यांनी आपल्या तेजस्वी भाषणातून केले होते. निधी समर्पणाचा एक भाग म्हणून स्वर्गीय अंकित दिवटे यांचे स्मृतीप्रित्यर्थ श्री.रामभाऊ जी दिवटे यांनी प्रभू श्रीराम जन्मभूमी मंदिर बांधकामाकरिता एकूण ₹.11,000 चा धनादेश समितीच्या प्रमुखांकडे सुपूर्द केला.कार्यक्रमाचे मुख्य भाग म्हणजे महाआरती होते.या भव्य महाआरतीत प्रभू श्रीराम मंदिर निर्माण गीत, हनुमान चालीसाचे पठण करून प्रभू श्रीरामांची भव्य महाआरती करण्यात आली या कार्यक्रमाला कन्हान नगरीचे माजी नगराध्यक्ष श्री.शंकररावजी चहांदे,माजी उपाध्यक्ष डॉ.श्री मनोहर रावजी पाठक, न.प. कन्हानचे विरोधी पक्षनेते श्री राजेंद्रजी शेंद्रे,श्री.रामभाऊजी दिवटे,जयरामजी मेहरकुळे,हिरालाल गुप्तता,मूलचंदजी शिंदेंकर,अमिश रुंघे,लीलाधर बर्वे,रिंकेश चवरे ,शैलेश शेळके, नगरसेवक-सौ.सुषमाताई चोपकर,सौ.वंदनाताई कुरडकर,सौ.वर्षाताई लोंढे ,संगीताताई खोब्रागडे,अनिताताई पाटील यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाला यशस्वी करण्यात संजय चोपकर,संजय रंगारी,अमोल साकोरे,रानु शाही,गुरुदेव चकोले,पऱ्याग पोटभरे,दिनेश खाडे,किरण चकोले,ऋषभ बावनकर,विनोद कोहळे,मयूर माटे,आनंद शर्मा,अमन घोडेस्वार,रिक्कु सिंह,बाडूलेजी,जयंता कोतपल्लीवार,बीरेश गुप्ता,सुरज मिश्रा,प्रमोद वंजारी,रोशन यादव, सौ.स्वातीताई पाठक, सौ.शालिनीताई बर्वे,सौ.सुषमाताई मस्के,सौ निलिनीताई पोटभरे, मनीषाताई वाडीभस्मे,तुलेशाताई नांनवटकर यांनी मेहनत घेतले. कार्यक्रमाचे संचालन सौरभ पोटभरे यांनी केले व उपस्थितांचे आभार अतुलजी हजारे यांनी मानले.