बिबटयाच्या हल्ल्यात एसंबा येथील जर्शी कारवड ठार तर बखारी ची जर्शी कारवड गंभीर जख्मी
#) बिबटयाचा धुमाकुळ, पाच घटनेत ७ प्राळीव जनावरांची शिकार करून ठार तर २ जख्मी केले.
कन्हान : – पारशिवनी तालुकातील एंसबा गाव शिवा रात शनिवार पहाटे सकाळी बिबटयाने हल्ल्या करून शेषराव ठाकरे ची गोठयात बाधलेली जर्शी कारवड ठार केली. तर बखारी शेतातील गोठयात बाधलेली सायवल प्रजातीची कारवड ला गंभीर जख्मी केले.पेंच व कन्हान नदी काठावरील गाव व शेत शिवारात बिब टयाने धुमाकुळ सुरू असुन पाच घटनेत ७ जनावर ठार तर दोन गंभीर जख्मी केल्याने पिपरी, गाडेघाट, जुनिकामठी, घाटरोहना, गोंडेगाव, टेकाडी, वराडा, वाघोली, एंसबा, नांदगाव, बखारी गावक-यात भितीचे वातावरण पसरले आहे.
पेच व्याघ्र प्रकल्पाच्या रामटेक वन क्षेत्र अंतर्गत पारशिवनी तालुक्यातील एसंबा येथे शुक्रवार (दि.१४) जानेवारी ला सायंकाळी शेतकरी शेषराव ठाकरे हे आपल्या गाव शिवारातील गोठयात ६ प्राळीव जनावरे बांधुन घरी आले. दुस-या दिवसी शनिवार (दि.१५) जानेवारी ला सकाळी शेतात गेल्यावर काही अंतरावर जर्शी कारवड गायीचा फडशा पडलेला दिसल्याने पशु पालक शेषराव ठाकरे यांनी गावक-यांच्या सहाय्याने वन विभाग पटगोवारीचे वनरक्षक श्री एस जी टेकाम यांना घटनेची माहीती भ्रमणध्वनी ने दिली. तात्काळ वनरक्षक एस जे टेकाम यांनी घटनेची माहीती आपले वरिष्ठ अधिकारी.वन क्षेत्र सहायक अशोक द्विग्रसे साहेबाना दिल्या वर वारिष्ठाचे आदेशाने वनकर्मीना सोबत घेऊन घटनास्थळी पोहचुन निरिक्षण करून पंच १) ज्ञानेश्वर काशिनाथ खंड़ाते राह. बखारी २) हेमराज खुशाल घरडे राह. एसंबा पंचाचे साहाय्याने पंचनामा करून शवाविच्छेदन पंचायत समिती पारशिवनी चे वरिष्ठ पशु वैद्यकिय अधिकारी यांनी पंचनामा करून अहवाल वनविभागाचे वनरक्षक एस जी टेकाम याना दिला. तसेच रामटेक वन परिक्षेत्र अंतर्गत पटगोवारी रेज मधिल बखारी येथील शेतकरी संजय भैय्याजी पांडे यांची सायवल प्राजातीची कारवड व गाई गाव शिवारात शेतात शुक्रवार (दि.१४) ला रात्री दुधारू पाळीव जनावरे बाधुन आपल्या घरी आले. व शनिवार (दि.१५ ) ला सकाळी शेतात गेले तर दिसले की, बिब टयाने दाेन वर्ष पाढरा रंगाची सायवल प्रजाती कारवड ची शिकार करून गंभीर जख्मी केले. जमीन ओली असल्याने बिबटयाचे पायाचे निशान स्पष्ट दिसत होते .घटनेची माहीती पिडित शेतकरी संजय भैय्याजी पांडे, श्रीराम पांडे यांनी पोलीस पाटील नरेन्द्र पांडे व नागरि काच्या मदतीने वनविभागाचे पटगोवारी वनरक्षक श्री एस जी टेकाम यांना भ्रमणध्वनीने दिली. तात्काळ वन रक्षक एस जे टेकाम यांनी आपले वरिष्ठ अधिकारी वन क्षेत्र सहायक अशोक द्विग्रेसे साहेबाना देऊन वरिष्ठाचे आदेशाने वनकर्मी सोबत घटनास्थळी पोहचुन घटना स्थळाचे निरिक्षण करून पंच १) लिलाधर वासुदेव ठाकरे राह. बखारी,२) वामन नत्थुजी पांडे राह.बखारी पंचाच्या मदतीने पंचनामा करून अहवाल वनविभागा चे क्षेत्र सहायक अधिकारी अशोक दिग्रसे साहेबाना वनरक्षक एस जी टेकाम यानी दिला.
एसंबा गावचे पिडीत पशुमालक शेषराव हेमाजी ठाकरे यांची दोन वर्षाची पाढरे रंगाची जर्शी कारवड बिबटयाच्या हल्यात मुत झाली. बाजार भाव प्रमाणे १६ हजार रुपये नुकसान भरपाई पशुमालक शेषराव ठाकरे यांना त्वरित देण्याची मागणी शेतकरी, गावकरी नागरिकांनी वनरक्षक टेकाम याच्याशी चर्चा करून केली. तसेच बखारी येथील पिडीत पशुमालक संजय भैयाजी पांडे यांची सुध्दा गंभीर जख्मी कारवडी चा औषधोपचार करिता लागणा-या खर्चाची भरपाई देण्याची मागणी गावातील पोलीस पाटील व शेतक-यांनी वनरक्षक श्रीकांत टेकाम शी चर्चा करून केली. बखारी गाव शिवारातील ही दुसरी व परिसरातील पाच व्या घटनेत बिबटयाच्या शिकार धुमाकुळीने आता पर्यंत ७ प्राळीव जनावरांची शिकार करून ठार तर २ गंभीर जख्मी केल्याने परिसरातील गावक-यात भिती चे वातावरण पसरल्याने या बिबट्यास वन विभागाने युध्द स्तरावर कार्य करून तात्काळ पकडुन ग्रामस्थाना भय मुक्त करावे. तसेच पिडीत पशुपालक शेतक-याना नुकसान भरपाई मिळुन देण्याची मागणी परिसरातुन जोर धरू लागली आहे.