सोशल माध्यमात अभ्रद भाषेचा वापर केल्याने गुन्हा दाखल
कन्हान ता. 15 मार्च
कन्हान पिपरी नगर परिषद द्वारे कन्हान शहरात स्वच्छता सार्वजनिक बांधकामाला विरोध दर्शवत हिंदू धर्माला ठेस पोहचेल अशी सोशल माध्यमात अभद्र भाषेचा वापर केल्याने न.प.अध्यक्ष सौ.करूणाताई अनिल आष्टणकर व शिवसेना पदाधिकारी यांनी कन्हान पोलिस स्टेशनला ठाणेदाराला निवेदन देऊन कारवाई करण्याची मागणी केली.
नितिन (बबलू) रमेश उमरे रा.शिवनगर कांद्रि येथील असुन गेल्या काही दिवसांत सोशल माध्यमात हिंदू धर्मा विरूदध आणि कन्हान-पिपरी नगर परिषद प्रशासनास अपमानजनक व अभद्र भाषाचा उपयोग केला. ज्यामुळे हिंदू धर्माचा लोकांन मध्ये अशांतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नितीनचा असल्या वागण्यामुळे हिंदू धर्माच्या लोकांच्या भावनांवर दुखावल्या गेल्या आहे. यामुळे कन्हान शहरातील हिंदू धर्मातील लोकांचा रोष बघता सौ.करूणाताई आष्टणकर न.प.अध्यक्ष व शिवसेनातील पदाधिकारी व कार्यकत्यांनी कन्हान शहरातील ठाणेदार अरुण त्रिपाठी यांना निवेदनातून कारवाई करण्याची मागणी केली. पोलीसानी घटनेचे गांभीर्य लक्षात येताचे नितिन उर्फ बबलू विरूदध धारा 505 (3), 294 अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. यावेळी वर्धराज पिल्ले, उपजिला प्रमुख शिवसेना (ग्रामीण), कन्हान न.प.अध्यक्ष करूणा आष्टणकर, शुभांगी घोगले उपजिला प्रमुख, न.प.उपाध्यक्ष डायलन शेंडे, कन्हान शहर प्रमुख छोटे राणे, मनीषा चिखले, योगेंद्र रंगारी, मनीष भिवगडे, रेखा टोहने,प्रवीण गोडे, हरीश तिडके,चिंटू वाकुडकर,
नीतू तिवारी, रजनीश मेश्राम, ममेश घोटे, अभिलाषा जाधव, शारदा शेंडे, किरण गाजभिये, अजय चाण, मोटू भावर व आदी शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते .