कन्हान नगरपरिषदेचा कार्यालयाचा पुढाकाराने विविध उपक्रम
कन्हान, ता.१६ एप्रिल
लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीत यावेळी सर्वाधिक मतदान पार पाडण्याच्या उद्देशाने मिशन डिटींक्शन ७५% पेक्षा जास्त मतदार टर्नआउट करणे व या सोबतच प्रथमच मतदार यांचा सहभाग सुनिश्चित करण्याचे दृष्टीने निवडणूक कार्यालय मार्फत स्वीप कार्यकम राबविण्यात आले आहे.
स्वीप कार्यक्रमाच्या प्रभावी अंबलबजावणी करिता नोडल अधिकारी रवींद्र राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यालय नगर परिषद कन्हान-पिपरी द्वारे विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
२०१९ च्या तुलनेत यंदा अधिक मतदान व्हावे यासाठी संपूर्ण शहरात जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. या क्रमाने समाजात राहणाऱ्या लोकांना मतदानासाठी प्रवृत्त केले जात आहे. मतदार यादीत नाव कसे शोधायचे आणि मतदान केंद्र कसे शोधायचे ते समजावून सांगितले.
त्याअंतर्गत मतदान जनजागृती, निवडणूक प्रतिज्ञा, विविध शासकीय योजना शिबीर, हस्ताक्षर मोहीम, सेल्फी मोहीम इत्यादी चे आयोजन करण्यात आले होते.
विविध उपक्रमांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. न.प कार्यालय अंतर्गत येणाऱ्या बळीराम दखने हायस्कूल, आदर्श हायस्कूल व हिराबाई उच्च प्राथमिक शाळा कन्हान यांनी प्रभात फेरी, प्रतिज्ञापत्र वाचन, चित्रकला स्पर्धा इत्यादी प्रकारचे उपक्रम घेतले व नागरिकांमध्ये मतदान जनजागृती करण्यात आली.
निवडणूक कार्यालय द्वारे देण्यात आलेल्या निवडणूक मार्गदर्शिका न.प कार्यालय द्वारे नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येत आहे व नागरिकांमध्ये मतदान जनजागृती करण्यात येत आहे.
Post Views: 796
Tue Apr 16 , 2024
अवैध रेती तस्करी करणाऱ्या ट्रक वर पोलिसांची कारवाई दोन आरोपी ताब्यात, तीस लाख सोळा हजार रु.मुद्देमाल जप्त कन्हान,ता.१६ एप्रिल कन्हान पोलीस हद्दीत मागील कित्येक महिन्या पासुन अवैध रेतीची चोरटी वाहतुक बिनधास्त पणे मोठ्या प्रमाणात सुरु आहे. कन्हान पोलीस आणि महसुल विभागा द्वारे कारवाई होत नसल्याने प्रशासनाच्या कार्यप्रणाली वर […]