विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या सत्कार करून जुन्या आठवणींच उजाळा
कन्हान, ता.१६ एप्रिल
शहरातील रायनगर येथिल सर्वात जुनी शैक्षणिक संस्था विकास हायस्कुल कन्हान येथे १९९९ मध्ये इयत्ता १० वीत शिक्षण घेतलेले. सध्या देशाच्या विविध भागात उच्च पदावर कार्यरत असलेले सुमारे ५० हुन अधिक विद्यार्थ्यानी शाळा सोडुन २५ वर्ष पूर्ण झाल्यामुळे माजी विद्यार्थ्यानी गुरूवर्य २५ शिक्षकांचा सत्कार करून जुन्या आठवणीला उजाळा देत रौप्य महोत्सवी वर्ष थाटात साजरे करण्यात आले.
विकास हायस्कुल कन्हान येथे शिक्षण घेऊन उच्च पदावर कार्यरत १९९९ मधिल इयत्ता १० वी च्या माजी विद्यार्थ्यानी शाळेच्या प्रागंणात रोप्य महोत्सवी कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानप्रकाश यादव यांना अध्यक्षेत घेऊन सेवानिवृत्त घनश्याम अल्लेडवार, एन एस मालविये, पद्माकर पोतदार, एकनाथ खर्चे, तेजराव गजभिये, सखाराम मंडपे, व्यवस्थापन समिती चे किशोर संघई, सौ.वेणु बारई, विशाखा ठमके, विकास प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र खंडाईत सह २५ गुरूवर्यांचा शाल, श्रीफळ व स्मृती चिन्ह देऊन सत्कार, सन्मान करण्यात आला. यावेळी माजी विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातुन शालेय जिवनातील जुन्या चिरस्मरणिय आठवणीला उजाळा देऊन उपस्थिताना भावविभौर पणे मंत्रमुग्ध केले.
प्रसंगी शिक्षकांच्या वतीने अल्लेडवार व मंडपे सरांनी अप्रतिम मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिन अल्लेडवार यांनी करून शाळेचे सर्व माजी विद्यार्थ्यांचा गुण गौरव केला. माजी विद्यार्थी रुपाली वंजारी व सुभाष वासाडे यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले तर रविंद्र कोचे यांनी सर्वाचे आभार व्यक्त केले. रोप्य महोत्सवी कार्यक्रमाच्या यशस्विते करिता माजी विद्यार्थ्यी अनुपम राऊत, हरिश ठाकरे, धीरज नाईक, राजेश पोटभरे, प्रशांत देशमुख, सिध्दार्थ टेंभुर्णे, अतुल ढोके, प्रदिप गायकवाड, रविद्र कोचे, अतुल हजारे, नरेश रक्षक, हरिश तिडके, प्रफुल फडणविस, सचिन हिंगे, अंबादास कारेमोरे, राजेश वानखेडे, नम्रता गज भिये, वर्षा हटवार, उज्वला डांगे, संपदा रोटकर, ज्योती बारई, सुषमा निंबाळकर आदीनी सहकार्य केले.
Post Views: 903
Sat Apr 27 , 2024
‘रामधाम’येथे ७५ जोडप्यांचे ‘शुभमंगलम’ कन्हान,ता.२७ एप्रिल जिल्ह्यातील मनसर येथे प्रसिद्ध ‘रामधाम’ तीर्थक्षेत्रात दरवर्षी मोठ्या उत्साहाने सामूहिक सर्वधर्मीय विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात येत असते. यात गोरगरीब वर-वधूचे चंद्रपाल चौकसे लोकसेवा प्रतिष्ठानतर्फे निःशुल्क स्वरूपात विवाह लावून देण्यात येतात. या समाजसेवी कार्याला आधार बहुउद्देशीय संस्था नागपूर, महिला व बाल विकास […]