ट्रॅव्हल्स -ऑटो अपघातात एका सैनिकाच्या मृत्यू‌ , सात सैनिक गंभीर 

ट्रॅव्हल्स -ऑटो अपघातात एका सैनिकाच्या मृत्यू‌ , सात सैनिक गंभीर

कन्हान, ता. १६ जुन 

   स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या नागपूर- जबलपूर महामार्गावरील कन्हान नदी पुलावर ट्रॅव्हल्स -ऑटो अपघातात एका सैनिकाच्या मृत्यू‌ झाला असून सात सैनिकावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे.

      पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यप्रदेश रिवा कडे जाणाऱ्या भरधाव ट्रॅव्हल्स चालकाने कामठी कडे येणाऱ्या तीन चाकी ऑटो रिक्षा ला दिलेल्या जबर धडकेत घडलेल्या अपघातात ऑटो चालकासह ऑटो मध्ये बसलेले आठ सैन्य जवान प्रवासी गंभीर जख्मी झाले होते.

  घटना घडताच पोलीस घटनास्थळी दाखल होऊन नागरिकांनी मदतीची धाव घेत जख्मी ऑटो चालकासह आठही जख्मि सैन्य जवानांना उपचारार्थ हलविण्यात आले. तीन वेगवेगळ्या रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले असून उपचार दरम्यान एका सैनिकाच्या मृत्यू‌ झाला. सात सैनिक व ऑटो चालक मृत्यूशी झुंज देत आहेत ही घटना आज सायंकाळीं ५  वाजता दरम्यान घडली. सदर आठही गंभीर जख्मी सैनिक हे कामठी येथील जी.आर.सी मध्ये कर्तव्यदक्ष भूमिका बजावत होते.

    आज रविवार सुट्टीचा दिवस असल्याने बाहेरगावी फिरून तीन चाकी ऑटो रिक्षाने कामठी कडे परत येत होते.

   कन्हान नदी पूलावर अनियंत्रित ट्रॅव्हल्स क्र.एम.एच ३१ एफ सी ४१५८ च्या चालकाने विरुद्ध दिशेने येणाऱ्या तीन चाकी ऑटो क्र एम एच ४९ ए आर ७४३३ ला दिलेल्या जोरदार धडकेत घडलेल्या भीषण अपघातात ऑटो मध्ये बसलेले आठ ही सैन्य जवान प्रवासी गंभीर जख्मि झाले.

   या गंभीर आठही जख्मि सैनिकांत कुमार पी, शेखर जाधव, मुरजम, अरविंद,‌ विग्नेश,‌ नागारत्नम,‌ धीरज रॉय, बी प्रधान चा समावेश आहे. तसेच ऑटोचालक शंकर खरजबान रा. गोराबाजार चा समावेश आहे. पोलिसांनी सदर घटनेची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

बोरडा- निमखेडा रस्त्याच्या कामात दिरंगाईने नागरीकांचे आंदोलन खा.श्यामकुमार बर्वे यांनी तातडीने अधिकारी व ठेकेदाराला आदेश

Sat Jun 22 , 2024
बोरडा- निमखेडा रस्त्याच्या कामात दिरंगाईने नागरीकांचे आंदोलन खा.श्यामकुमार बर्वे यांनी तातडीने अधिकारी व ठेकेदाराला आदेश कन्हान,ता.२२    बोरडा- निमखेडा सिमेंट रस्त्याचे काम मागिल कित्येक वर्षापासुन कासव गतीने काम सुरू होते. पावसाळा सुरू होताच स्त्यावरिल खडयात पाणी साचुन चिखलातुन वाट काढत नागरिकांना ये-जा करतांना‌ नाहक त्रास सहन करावा लागत होता. याची […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta