कन्हान प्राथमिक आरोग्य केंन्द्र येथे न्युमोकोकल काॅन्जुगेट वैक्सीन चा शुभारंभ
कन्हान : – नागरिकांनी आपल्या लहान बाळांना न्युमो कोकल आजारापासुन सुरक्षित ठेवण्याकरिता सार्वत्रि क लसीकरण मोहिमेत न्युमोकोकल काॅन्जुगेट वैक्सी न पीसीव्ही लस चा कन्हान प्राथमिक आरोग्य केंन्द्रात जिल्हास्तरीय मोहीमचे उद्घाटन जि प नागपुर अध्यक्षा सौ रश्मी बर्वे यांच्या हस्ते शुभारंभ करून जिल्हयाती ल नागरिकांनी आपल्या लहान बाळांना प्राथमिक आरोग्य केंन्द्रा घेऊन जाऊन न्युमोकोकल काॅन्जुगेट वैक्सीन लावुन घेऊन लाभ घ्यावा असे आवाहन सौ रश्मी बर्वे यांनी केले आहे.
मंगळवार (दि.१३) जुलै २०२१ ला न्युमोकोकल काॅन्जुगेट वैक्सीन चा जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमती रश्मी बर्वे यांचे हस्ते जिल्हास्तरीय शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख अतिथी पारशिवनी पंचायत समिती सभापती मिनाताई कावळे, कांद्री सरपंच श्री बलवंत पडोळे, रुग्ण कल्याण समिती सदस्य सतीश घारड, करुणा भोवते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ साळवे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ प्रशांत वाघ प्रा मुख्याने उपस्थित होते. प्रास्ताविकातुन प्राथमिक आरो ग्य केंन्द्र कन्हान वैद्यकीय अधिकारी डॉ योगेश चौधरी यांनी लहान मुलांना न्युमोकोकल आजारापासुन सुर क्षित ठेवण्याकरिता सार्वत्रिक लसीकरण मोहिमेत न्युमोकोकल काॅन्जुगेट वैक्सीन पीसीव्ही लस समावि ष्ट करण्यात आली आहे. न्युमोकोकल आजार म्हणजे स्टेप्टोकोकस न्युमोनिया ह्या बॅक्टरीयामुळे होणारे आ जार असुन बॅक्टरीया शरिरातील विविध भागात पसरू न वेगवेगळे आजार उत्पन्न करू शकतो. हा बॅक्टरीया ५ वर्षाच्या आतील मुलां मधील न्युमोनियाचे प्रमुख कारण आहे. असे स्पष्ट केले. डॉ साळवे सरांनी या लसीने मुलां मधील न्युमोकोकल आजार व त्यामुळे होणारे मृत्यु टाळु शकतो. न्युमोकोकल आजार २ वर्षा पर्यंत च्या बालकामध्ये दिसुन येतो व १ वर्षाच्या आती ल मुलांमध्ये धोका सर्वात अधिक असतो. न्युमोकोक ल आजार टाळण्याकरिता पीसीव्ही लसीकरण हा सग ळ्यात कमी खर्चीक व प्रभारी उपाय आहे. लसीचा पहिला डोज ६ आठवड्यात लावण्यात येत असुन दुस रा डोज मुलांना १४ आठवडे नंतर ९ महिन्यात पीसी व्ही बुस्टर डोज देण्यात येईल. असे मार्गदर्शन करण्या त आले. तसेच डॉ प्रशांत वाघ यांनी न्युमोकोकल न्युमोनिया म्हणजे काय हा श्वासनाच्या मार्गाला होणा रा एक संसर्ग आहे, ज्यामुळे फुप्फुसावर सुज येवुन पाणी भरू शकते. श्वास घ्यायला त्रास होऊ शकते. ऑक्सीजन कमी होऊ शकते, याची लक्षणे खोकला, ताप, फिट येणे, बेशुद्ध होणे. असे मार्गदर्शन करण्यात आले. आणि रश्मी बर्वे यांनी अध्यक्षीय भाषणात सार्व त्रिक लसीकरण मोहिमेचा शुभारंभ झाल्याने नागरिकां नी जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात आपल्या लहा न मुलांना घेऊन जाऊन न्युमोकोकल काॅन्जुगेट वैक्सी न लावुन घ्यावे असे आवाहन केले आहे. ही लस मुलां ना सुरक्षित असुन मुलांमधील मृत्यु दर कमी करू शक तो. पीसीव्ही लसीकरणामुळे सर्व प्रकारच्या न्युमोनिया पासुन संरक्षण होईल तसेच कोव्हिड १९ नियमित तपा सणी, मास्क व सेनिटाइजर चा वापर करण्या बाबत मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरि ता प्राथमिक आरोग्य केंन्द्र कन्हान चे कर्मचारी श्री धोटकर, हरडे, पवार, अजय राऊत, सुरेंद्र गिऱ्हे, कोल्हे, माहुरिया, श्रीमती कंभाले, हटवार सह इतर कर्मचारी हयांनी परिश्रम घेतले.