टेकाडी येथे अवैध कोळसा टाल वर धाड
वेकोलि सुरक्षा अधिकारी यांची सयुक्त कारवाहीत ४६८० रूपयाचा कोळसा जप्त.
कन्हान : – महाजन नगर टेकाडी येथे चार आरोपीतांनी संगमत करून अवैध कोळसा टाल सुरू करून वेको लि चा कोळसा चोरी करून ढीग जमा करित असल्या ची वेकोलि सुरक्षा अधिकारी यांना गुप्त माहिती मिळा ल्याने वेकोलि सुरक्षा अधिकारी व कन्हान पोलीस यांनी संयुक्त कारवाई करित टेकाडी येथे अवैध कोळ सा टालवर धाड मारली असता एकुण ११७० किलो किंमत ४६८० रुपयाचा कोळसा मिळुन आल्याने कन्हान पोलीसांनी तीन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास करीत आरोपीचा शोध घेत आहे.
प्राप्त झालेल्या माहितीनुसार वेकोलि कामठी उपक्षेत्र सुरक्षा अधिकारी रविकांत रामदास कंडे वय ४४ वर्ष हे शुक्रवार (दि.१५) जुलै ला सायंकाळी ६ वाजता दरम्यान पेट्रोलिंग करित असताना गुप्त बातमी दारा कडुन माहिती मिळाली की, महाजन नगर टेकाडी येथे अवैध कोळसा टालवर वेकोलि चा कोळसा चोरून साठा जमा करित आहे. तेव्हा वेकोलि सुरक्षा अधिकारी व कन्हान पोलीसानी सयुक्तरित्या महाजन नगर टेकाडी येथे जावुन धाड मारली असता तेथे चोरीचा कोळसाचा अवैध साठा मिळुन आल्याने रविकांत कंडे व इतरांनी गोपनीय माहिती काढुन सदर दगडी कोळ सा हा आरोपी १) बिट्टु ऊर्फ नितेश रमेश भुते राह. वार्ड क्र.४ महाजन नगर टेकाडी, २) चिंटु सिंग, ३) फारूक अब्दुल्ला शेख दोघेही राह. कांद्री कन्हान यांनी चोरून विकणे करिता कोळसाचा साठा जमा करून ठेवला होता. तो लेबर च्या मदतीने पीक अप मध्ये भरून वजन केले असता ११७० किलो वजन असुन प्रति किलो ४ रुपये प्रमाणे ४६८० रुपयाचा दगडी कोळसा जप्त करून वेकोलि खुली खदान डेपो इंदर काॅलरी येथे जमा केला. सदर प्रकणा बाबत कन्हान पोलीसांनी फिर्यादी रविकांत कंडे यांच्या तोंडी तक्रारी वरून आरोपी १) बिट्टु ऊर्फ नितेश रमेश भुते, २) चिंटु सिंग, ३) फारुक अब्दुल्ला शेख यांचा विरुद्ध कलम ३७९, ३४ भादंवि अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्ष क विलास काळे यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीस करीत असुन आरोपीचा शोध घेत आहे.
Post Views: 1,186
Mon Jul 18 , 2022
शिवशक्ती डहाका मंडळ तर्फे शाहिर राजेंद्र बावनकुळे यांचा सत्कार Post Views: 1,186