शिवसेना पक्षात असंख्य महिलांची नियुक्ती व प्रवेश
कन्हान,ता.१६ जुलै
कन्हान येथील महिलांनी उद्धव ठाकरे यांच्यावर विश्वास दाखवत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष, रामटेक विधानसभा प्रमुख विशाल बरबटे यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवार (दि.१५ जुलै) रोजी महिला आघाडीत प्रवेश केला.
जिल्हा प्रमुख देवेंद्र गोडबोले, संपर्क प्रमुख उत्तम कापसे यांच्या प्रमुख उपस्थितीत सौ.दुर्गाताई विजय कोचे यांची रामटेक विधानसभा महिला संघटीकापदी नियुक्ती करण्यात आली. तर सौ.वैशालीताई थोरात यांची महिला आघाडी कन्हान शहर प्रमुख पदी नियुक्ती शिवसेना महिला आघाडी जिल्हा प्रमुख सौ.वंदनाताई लोणकर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन निवड करण्यात आली.
यावेळी उपस्थित महिलांना पक्षाच्या ध्येय धोरण, विचारप्रणाली व पक्ष संघटन मजबूत करण्याच्या अनुषंगाने सौ.वंदनाताई लोणकर, देवेंद्र गोडबोले, विशाल बरबटे यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाला प्रामुख्याने पारशीवणी तालुका प्रमुख कैलास खंडार, युवा सेना जिल्हा प्रमुख लोकेश बावनकर, नगरसेविका मोनीकाताई पौणीकर, तालुका संघटक गणेश मस्के, युवासेना उपजिल्हा प्रमुख समीर मेश्राम, कन्हान शहर प्रमुख प्रभाकर बावणे, उमेश पौणिकर, जितेंद्र जम्बे , योगीराज अवसरे, पंकज कुहिटे, विजय कोचे, सारंग घरजाडे व जयवंत थोरात सह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
प्रसंगी महिला आघाडी, नितु तिवारी, नीलिमा घरजाडे, उपसरपंच गांगणेर हिवरा, वैशालिताई खंडार, पुष्पा गावंडे, आशा महल्ले, सुषमा ठवकर, अनिता घोटेकर, रोशनी पौणिकर, उषा साकोरे, जयश्री हिवसे, कुंदा बागडे, मंदा बागडे, वनिता मोखरकर, उमाताई नेवरा, आशा समशेर, बबिता कनोजे, सुजाता गोंडाने, माधुरी कुमरे, नितु रायचंद, सुषमा कुमरे, सीमा चव्हाण, ललिता शर्मा, मीनाक्षी शर्मा व माया नामदेवे सह असंख्य महिलांनी यावेळी पक्ष प्रवेश केला.
Post Views: 841
Sun Jul 16 , 2023
सहा टायर व डिस्क चोरी करणारे तीन आरोपींना अटक स्थानिक गुन्हेशाखा पोलीसांची कारवाई, मुद्देमाल जप्त कन्हान,ता.१६ जुलै पोलीस स्टेशन, कन्हान हद्दीतील हायवे इन हाॅटेलचा मागे नागपुर -जबलपुर राष्ट्रीय महामार्गावर उभा असलेल्या आयसर टँकर ट्रकचे सी.एट कंपनीचे सहा टायर व डिस्क चोरी करणाऱ्या तीन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखा, नागपुर […]