सहा टायर व डिस्क चोरी करणारे तीन आरोपींना अटक
स्थानिक गुन्हेशाखा पोलीसांची कारवाई, मुद्देमाल जप्त
कन्हान,ता.१६ जुलै
पोलीस स्टेशन, कन्हान हद्दीतील हायवे इन हाॅटेलचा मागे नागपुर -जबलपुर राष्ट्रीय महामार्गावर उभा असलेल्या आयसर टँकर ट्रकचे सी.एट कंपनीचे सहा टायर व डिस्क चोरी करणाऱ्या तीन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखा, नागपुर ग्रामीण पोलीसांनी पकडुन कन्हान पोलीसांना स्वाधिन केले.
विशाल आनंद जांभुळकर (वय ४०) रा.सन्याल नगर टेकानाका, नागपुर अनुश्री रोड लाईन ट्रांसपोर्ट चे काम करीत असुन त्यांचे आयसर कंपनीच्या टँकर चौधा चाकी ट्रक क्र.एमएच २२ ए.एन.१९६४ त्यांनी किरायाणे घेतला. एल.पी.जी गैस भरुन जबलपुर ते आंध्रप्रदेश लाईनवर चालतात. पंधरा दिवस पासुन विशाल जांभुळकर यांचा टँकर मध्ये बिघाड झाल्याने त्यांनी कन्हान रिंग रोड वर हायवे इन हॉटेलच्या मागे उभा करुन ठेवला होता. शुक्रवार (दि.३०) जुन सायंकाळी ७ वाजता ते शनिवार (दि.१) जुलै सायंकाळी ७ वाजता दरम्यान आयसर टँकर चे सीएट कंपनीचे सहा टायर डिस्क अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्याने विशाल जांभुळकर यांनी तक्रार दाखल केली होती.
या प्रकरणातील आरोपी च्या शोध स्थानिक गुन्हे शाखा नागपुर ग्रामिण पोलीस पथक पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे यांचा मार्गदर्शनात कन्हान परिसरात पेट्रोलिंग करित असतांना गुप्त माहितीनुसार, सिहोरा गावातील सागर हुमने युवक असल्याचे कडले. गुन्हे शाखा पोलीसांनी आरोपी सागर देवीदास हुमने (वय २२) रा. सिहोरा ताब्यात घेऊन विचापुस केली असता तीन लोकांसोबत चोरी केल्याची कबुली दिली. मुद्देमाल घरामध्ये लपवुन ठेवल्याचे सांगितल्याने घरामधुन सहा टायर डिस्क किंमत ६०,००० रुपये जप्त करून आरोपी अंकीत दुर्योधन बागडे (वय २३) रा.सिहोरा, निकेश नामदेव वासनिक (वय २२) रा. सिहोरा यांना ताब्यात घेऊन कन्हान पोलीसांच्या स्वाधिन करित फरार आरोपी आनंद मेश्राम याचा शोध स्थानिक गुन्हे शाखा पोलीस व कन्हान पोलीस करित आहे. सदर कारवाई नागपुर ग्रामिण पोलीस अधिक्षक विशाल आनंद, अप्पर पोलीस अधिक्षक संदीप पखाले यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे यांचा नेतृत्वात सहायक पोलीस निरीक्षक अनिल राऊत, हेड कांस्टेबल विनोद काळे, नाना राऊत, ईक बाल शेख, पोलीस शिपाई अभिषेक देशमुख यांनी ही कारवाई यशस्विरित्या पार पाडली.
Post Views: 813
Sun Jul 16 , 2023
शिक्षक सेवकाकरिता निधी उपलब्ध करून बेरोजगार युवकास प्राधान्य द्या – युवक कॉंग्रेस कन्हान,ता.१६ पारशिवनी तालुक्यातील जि.प.शाळेच्या रिक्त पदावर शिक्षक सेवकांच्या भरती करिता पुरेशा निधी उपलब्ध करून बेरोजगार शिक्षित युवा वर्गास नियुक्ती मध्ये प्राधान्य देण्यात यावे. अशी मागणी रामटेक विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष निखिल दा. पाटील यांच्या नेतृत्वात […]