शिक्षक सेवकाकरिता निधी उपलब्ध करून बेरोजगार युवकास प्राधान्य द्या – युवक कॉंग्रेस
कन्हान,ता.१६
पारशिवनी तालुक्यातील जि.प.शाळेच्या रिक्त पदावर शिक्षक सेवकांच्या भरती करिता पुरेशा निधी उपलब्ध करून बेरोजगार शिक्षित युवा वर्गास नियुक्ती मध्ये प्राधान्य देण्यात यावे. अशी मागणी रामटेक विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष निखिल दा. पाटील यांच्या नेतृत्वात तहसिलदार पारशिवनी यांना निवेदनातून मागणी करण्यात आली आहे.
पारशिवनी तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या एकुण ९७ शाळा असुन या शाळांपैकी ४ शाळेत एक ही शिक्षक नाही. या शाळेत दुसऱ्या शाळेचे शिक्षक येऊन शिकवतात. तालुक्याच्या शाळांमध्ये एकुण ६२ रिक्त पदे आहे. ही रिक्त पदे भरून त्यांच्या करिता खनिज निधी अंतर्गत निधी उपलब्ध करून द्यावा. तालुक्यात शेतकरी, आदिवासी, शेतमजुर वर्ग असुन मोठ्या प्रमाणात गरिबी रेषेखालील कुटुंबे आहे. अशा परिस्थितीत मुलांना खाजगी शाळेत शिकवणे झेपणारे नसुन कठीण आहे. या सर्व कारणांमुळे जि.प.च्या शाळेचे शिक्षणाचा स्तर वाढविण्यासाठी, प्रत्येक गावातील मुले-मुली शिक्षणापासुन वंचित राहता कामा नये, येणाऱ्या पिढीचे भविष्य उज्वल करण्यासाठी नविन तरुण शिक्षकांची भर्ती करावी. शासनाने नुकताच काढलेला शासन निर्णयामध्ये सेवानिवृत्त शिक्षकांची कंत्राटी तत्वावर नियुक्त करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. परंतु पेंशन धारकांना संधी दिल्यास बेरो जगारांना संधी कशी मिळणार ? जि.प.च्या शाळा डिजिटल झाल्या आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून वाढणारी बेरोजगारीचा विचार करून शिक्षणाचा स्थर उच्चवण्यासाठी युवा बेरोजगार वर्गाला प्राधान्य देण्यात यावे. असे मागणी जिल्हाधिकारी यांना कळवुन नागपुर जिल्हा परिषद अंतर्गत पारशिवनी तालुक्यातील जि. प. शाळेत शिक्षण सेवक नेमणुक करण्याकरिता निधी उपलब्ध करून बेरोजगार युवा वर्गाला प्राधान्य देण्यात यावे. जेणे करून कुठेलिही जि प शाळा बंद होणार नाही.
शिक्षक सेवकांच्या भरती साठी पुरेसी निधी उपलब्ध करून या क्षेत्रातील बेरोजगार शिक्षित युवा वर्गास प्राधान्य द्या. अशी मागणी रामटेक विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष निखिल दा.पाटील यांच्या नेतृत्वात तहसिलदार पारशिवनी यांना निवेदनातून मागणी करण्यात आली आहे. प्रसंगी पंचायत समिती पारशिवनी सभापती सौ.मंगलाताई निंबोने, बाजार समिती पारशिवनी संचालक वैभव खोब्रागडे, युवक कॉंग्रेस नागपुर जिल्हा ग्रामिण महासचिव गौरव भोयर, सचिव रोहित बर्वे, अजय कापसिकर, युवक कॉंग्रेस कन्हान शहर उपाध्यक्ष सोहेल सय्यद, शुभम राऊत, गौतम पाटील, अनिकेत निंबोन, रोशन तडस, राजेंद्र कावळे, चक्रधर खेरगडे, धनराज गोरले, महेश धोगडे, प्रज्वल मेश्राम आदी सह युवक काँग्रेस चे पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.
Post Views: 662
Sun Jul 16 , 2023
कन्हान नदी पात्रात अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला कन्हान,ता.१६ जुलै निलज शिवारातील कन्हान नदी पात्रात अनोळखी इसमाचा मृतदेह आढळुन आल्याने पोलीसांनी गुंडेराव चकोले यांचा तक्रारी वरून गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहिती नुसार, रविवार (दि.१६) जुलै ला सकाळी ११.३० वाजता दरम्यान गावातील पोलीस पाटील गुंडेराव श्रावण चकोले […]