७६ व्या दिनानिमित्त भूमिपुत्र बहुउद्देशी संस्थेच्या मार्फत रक्तदान शिबिर व विद्यार्थी सत्कार

७६ व्या दिनानिमित्त भूमिपुत्र बहुउद्देशी संस्थेच्या मार्फत रक्तदान शिबिर व विद्यार्थी सत्कार

कन्हान,ता.१६ ऑगस्ट

     भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या ७६ व्या दिनानिमित्त भूमिपुत्र बहुउद्देशी संस्थांच्या मार्फत तारसा चौक, महाकाली कॉम्प्लेक्स येथे रक्तदान शिबिर आणि विद्यार्थी सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

  भूमिपुत्र बहुउद्देशीय संस्था यांनी इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रक्तपेढी नागपूर यांच्या माध्यमातून रक्तदान शिबिर कन्हानला घेण्यात आले. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने रक्तदान शिबीरांत ७१ युवकांनी २ तरुणी रक्तदान केले. तर मान्यवरांच्या हस्ते १५ गुणवंत विद्यार्थ्यांना स्कूल बॅग, स्मृतिचिन्ह, पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते देऊन सत्कार करण्यात आला.

   कार्यक्रमाचे अध्यक्ष आशिष जयस्वाल आमदार रामटेक विधानसभा उपस्थित होते. शिबिराचे उद्घाटक नगरपरिषद अध्यक्ष सौ.करुणाताई आष्टणकर हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे पाहुणे पर्यटक मित्र चंद्रपाल चौकसे आणि कन्हान नगरपरिषदेचे नगरसेवक राजेश यादव, राजेंद्र शेंद्रे तसेच माजी जिल्हा उपाध्यक्ष शरद डोणेकर, दखने हायस्कूल मुख्याध्यापिका ठमके मॅडम उपस्थित होते.

 कार्यक्रमाचे आयोजन चिंटू वाकुडकर भुमीपुत्र बहुउद्देशीय संस्था अध्यक्ष यांनी केले.

   कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरीता समशेर पुरवले, रजनीश मेश्राम, सुनील लक्षणे, हरीश तिडके, भरत चकोले, मंगेश धोटे, अनिकेत नानोटे, आशिष वानखेडे, राम भैय्या थदानी, दीपक कुंभलकर, सुमेध नितनवरे, करण पाली, मयूर माटे, राजू चोपकर, योगेश शेंडे,सोनू मसराम आदी कार्यकर्तेचे यांचे सहकार्य लाभले..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

कन्हान शहरात १५ ऑगस्ट २०२३ स्वातंत्र्याचा महोत्सव साजरा

Thu Aug 17 , 2023
कन्हान शहरात १५ ऑगस्ट २०२३ स्वातंत्र्याचा महोत्सव साजरा कन्हान,ता.१६ ऑगस्ट      भारत देश १९४७ ला स्वातंत्र होऊन ७६ वर्ष पुर्ण होऊन या वर्षी ७७ वा स्वातंत्र दिन कन्हान परिसरातील शासकिय, सामाजिक, शैक्षणिक संस्था व्दारे विविध कार्यक्रमाने थाटात साजरा करण्यात आला. स्वामी विवेकानंद चॅरिटेबल ट्रस्ट अंतर्गत ग्रामोन्नती प्रतिष्ठाण कन्हान   […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta