७८ वा स्वातंत्र दिन ग्रामौन्नती प्रतिष्ठाण व शेतकरी कष्टकरी महासंघा व्दारे थाटात साजरा 

७८ वा स्वातंत्र दिन ग्रामौन्नती प्रतिष्ठाण व शेतकरी कष्टकरी महासंघा व्दारे थाटात साजरा

कन्हान,ता.१६

   विवेकानंद सेवा मंडळ ट्रस्ट, ग्रामौन्नती प्रतिष्ठाण आणि शेतकरी कष्टकरी महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने माजी खासदार प्रकाश जाधव यांचे निवास स्थान विवेकानंद नगर, कन्हान येथे ७८ वा स्वातंत्र दिन सोहळा थाटात साजरा करण्यात आला. 

    गुरूवार (दि.१५) ऑगस्ट ला सकाळी ९.३० वाजता विवेकानंद सेवा मंडळ ट्रस्ट, ग्रामौन्नती प्रतिष्ठाण आणि शेतकरी कष्टकरी महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने माजी खासदार प्रकाश जाधव यांचे अध्यक्षेत भारत मातेच्या प्रतिमेचे देशमुख गुरूजी यांच्या हस्ते, महात्मा गांधीच्या प्रतिमेचे डॉ.श्रीकृष्ण जामोदकर यांचे हस्ते, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे नगरसेविका मोनिका पौनिकर यांच्या हस्ते आणि राष्ट्रध्वजाचे सेवानिवृत्त सैनिक प्रविण सातदेवे यांचे हस्ते पुजन करून नगरपरिषद स्वच्छता सुपरवा ईझर जावेद यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकवुन सलामी देऊन राष्ट्रगीत घेण्यात आले. 

   यावेळी सेवानिवृत्त भारतीय सैनिकांचा सत्कार करण्यात आला. यानंतर नगरसेविका रेखा टोहणे, पुष्पा कावडकर, राखी परते, माजी जि.प.उपाध्यक्ष शरद डोणेकर, शिवसेना (उबाठा) पारशिवनी तालुकाध्यक्ष कैलास खंडार, बाबाराव दुपारे आदी मान्यवरांनी स्वातंत्र्यांचा गुणगौरव करित उपस्थिताना मार्गदर्शन केले. आपला देशाला स्वातंत्र करण्याकरिता हजारो स्वातंत्र सैनिक, देशभक्तानी आपल्या प्राणाची आहुती देऊन देश स्वातंत्र केला. आता ७७ वर्षे हो़ऊन सु़ध्दा भारतीय नागरिकांची पाहिजे त्याप्रमाणे विकास नाही. सुरूवातीला पाहिजे तशी साधन सामुग्री नसताना सुध्दा सत्तेचे विकेंद्रीकरण करून तळागाळातील सर्व नागरिकांचा विकास साधण्याचे ध्येय गाठण्याचा मुलमंत्र होता. परंतु आता सत्तेचे केंद्रीयकरण होत गरिब गरिबच होत, मोजके विशिष्ट मंडळी श्रीमंत होत असमानता, शहराच्या तुलनेत ग्रामिण गाव खेडयात विकासात दुजाभाव दिसत आहे. यामुळे बेरोजगारी, महागाईने नागरिक, युवा, शेतकरी, महिला त्रस्त असल्याने न्याय हक्का करिता सर्वानी एकत्र येत अन्याया विरूध्द पेटुन उठुन लढा देऊ तरच आपली येणारी पिढी सुरक्षित करू शकु असे आपल्या अध्यक्षिय मार्गदर्शनात प्रकाश जाधव यांनी संबोधित केले.

   कार्यक्रमाचे सुत्र संचालन रविंद्र चकोले यांनी तर ग्रामोन्नती प्रतिष्ठाण सचिव मोतीराम रहाटे यांनी आभार मानले. याप्रसंगी सेवानिवृत्त सैनिक शेरूभाई शेख, रवि रंग, अंबास्कर, डॉ. योगेश जुनघरे, किशोर बेलसरे, गणे़श पानतावने, नगरसेविका गुंफाताई तिडके, लोक कलावंत निशाताई खडसे, पत्रकार कमलसिंह यादव, सुनिल सरोदे, सुर्यभान फरकाडे, सतिश घारड, विवेक पाटील, आकाश पंडितकर, रविंद्र दुपारे, किशोर वासाडे, नगरसेवक राजेंद्र शेंदरे, विनय यादव, शांताराम जळते, पटले सर, एकनाथ खर्चे, नथुजी चरडे, रूमदेव मानकर, किशोरी अरोरा, ताराचंद निंबाळकर, विठ्ठल मानकर, रतिराम सहारे, बालाजी नायर, ज्ञानेश्वर दारोडे, अखिलेश मेश्राम सह सेवा निवृत्त सैनिक, शिक्षक, कर्मचारी, जेष्ठ नागरिक, व्यापारी, आशा वर्क्स, अंगण वाडी सेविका, सामाजिक राजकिय पदाधिकारी, कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते. 

   कार्यक्रमाच्या यशस्विते करिता दिलीप राईकवार, कमलेश पांजरे, कोठीराम चकोले, सचिन साळवी, प्रविण गोडे, गणेश भोंगाडे, विजय डोणेकर, प्रभाकर बावने, गोविंद जुनघरे, बंटी हेटे, जिवन ठवकर, रूपेश सातपु ते, राजु गणोरकर, प्रतिक जाधव, निलेश गाढवे, केतन भिवगडे, योगराज अवसरे, हबीब शेख, सोनु कुरडकर, यशवंत खंगारे, अशोक मेश्राम, हफीज शेख, प्रशांत येलकर, मनोज गुडघे, पुरुषोतम येणेकर, प्रकाश तिमांडे, शितल भिमणवार, आशिष वडस्कर, निशांत जाधव, श्याम मस्के, संतोष गिरी, राहुल ऊके, राजकुमार बावने, आयुष भोगे, चेतन ठवरे सह अनेक कार्यकर्ते व सदस्यांनी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

पं.ज.नेहरू विद्यालयात कु.शर्तिका टेकाम यांच्या हस्ते ध्वजारोहण

Fri Aug 16 , 2024
पं.ज.नेहरू विद्यालयात कु.शर्तिका टेकाम यांच्या हस्ते ध्वजारोहण कन्हान,ता.१५     पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय व भारतरत्न इंदिरा गांधी कनिष्ठ महाविद्यालय कन्हान यांच्या संयुक्त विद्यमाने ७८ वा “स्वातंत्र्य वर्धापन दिन” नगर सुधार समितीचे पदाधिकारी, नगरातील गणमान्य नागरिक, शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी यांच्या उपस्थितीमध्ये साजरा […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta