श्री नारायण विद्यालयाने ७८ वा स्वातंत्र्यदिन साजरा
वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण
कन्हान,ता.१५
श्री नारायण विद्यालयात ७८ वा स्वातंत्र्यदिन श्री नारायण विद्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहण समारंभ डॉ.विश्वेश्वर जुनघरे यांच्या अध्यक्षतेखाली एन.बाबु नानन अध्यक्ष श्री नारायण मानव सेवा व शिक्षण प्रसारक मंडळ, कन्हान यांच्या उपस्थितीत वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी भारतातील सर्व राज्ये आणि धर्मांच्या वेशभूषेत संगीत आणि देशभक्तीपर नृत्य सादर करण्यात आले.
यावेळी संघटनेच्या सचिव सौ.सरस्वती बाबू नानन, विनायक वाघधरे, भगवान नितनवरे माजी सरपंच कांद्री, हरिभाऊ पडोळे, श्री नारायण विद्यालय इंग्लिश मीडियम हायस्कूल व ज्यू.महाविद्यालयाच्या मुख्याध्यापिका कु. प्रीशा इंद्रकुमार मेंघानी, श्री नारायण विद्यालय इंग्रजी माध्यम प्राथमिकच्या मुख्याध्यापिका, कु. अर्चना शैलेश यादव, श्री नारायण विद्यालय हिंदी माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका, कु. श्री नारायण विद्यालय हिंदी उच्च प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका मंजू बिंदुसार लोखंडे, कु. क्रिस्टीना डेविड बमझई व सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
Post Views: 632
Sat Aug 17 , 2024
स्वातंत्र्य टिकवून ठेवायचे असेल तर समस्यांना मुळातूनच नष्ट केल्या पाहिजे- नरेंद्र वाघमारे कन्हान,ता.१५ स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारत देशाने अनेक क्षेत्रात प्रगती केली आहे. विज्ञान व तंत्रज्ञान, कृषी, आरोग्य, शिक्षण व वाहतूक अशा अनेक क्षेत्रात नेत्रदीपक प्रगती केली आहे. परंतु त्याचबरोबर अनेक समस्या ही आपल्या देशाला भेडसावत आहे. महागाई, […]