२५ सप्टेंबर ला शिक्षकांचे सामुहिक रजा आंदोलन  शाळा बंद ठेवून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा प्रशासकीय व्हाट्सअप ग्रुपवरूनही होणार लेफ्ट

२५ सप्टेंबर ला शिक्षकांचे सामुहिक रजा आंदोलन 

शाळा बंद ठेवून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

प्रशासकीय व्हाट्सअप ग्रुपवरूनही होणार लेफ्ट

कन्हान,ता.१५

    महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडील शिक्षक संचमान्यतेबाबत (दि.१५) मार्च २०२४ चा व कंत्राटी शिक्षक भरती बाबतचा (दि.५) सप्टेंबर २०२४ चा शासन निर्णय वाडीवस्तीवरील विदयार्थ्यांवर अन्यायकारक असल्याने सदरचे दोन्ही शासन निर्णय रद्द करावेत या मागणीसाठी राज्यातील सर्व प्राथमिक शाळा दि.२५ सप्टेंबर रोजी बंद ठेवून राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्धार पुणे येथे नुकत्याच झालेल्या राज्यातील सर्व संघटनांच्या बैठकीत घेण्यात आला.

     शिक्षक भवन पूणे झालेल्या बैठकीत शासनाच्या अन्यायकारक शासन निर्णयामुळे राज्यातील १५ हजार शाळांमधील १ शिक्षक कमी होवून १५ हजार शाळांमधील सुमारे २ लाख विद्यार्थ्यांवर अन्याय होणार असल्याने सदरचे शासन निर्णय शासनाने तात्काळ मागे घ्यावेत असे मत सर्व संघटना प्रतिनिधींनी व्यक्त केले.

    महाराष्ट्र शासनाकडून (दि. १५) मार्च २०२४ च्या शासननिर्णय द्वारे शिक्षक निश्चितीचे जाहीर केलेले निकष हे वाडीवस्तीवरील विद्यार्थ्यांवर अन्यायकारक आहेत.वाडीवस्तीवर जन्म झाला म्हणून पटसंख्येअभावी शिक्षक कमी करून तेथील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणापासून वंचित ठेवणे हा त्या विद्यार्थ्यांवर अन्यायच आहे. वाडी-वस्तीवर जन्म झालेल्या विद्यार्थ्यांचा दोष तरी काय? त्याला इतर शाळांमधील विद्यार्थ्यांप्रमाणे दर्जेदार शिक्षण मिळण्याचा हक्क व अधिकार बालकांच्या मोफत व सक्तिच्या शिक्षणाचा अधिनियमाने दिला आहे तो हक्क शासनास डावलता येणार नाही असेही मत सर्व उपस्थितांनी व्यक्त केले.

     आजच्या बैठकीस शिक्षक संघाचे नेते संभाजी थोरात, अखिल महाराष्ट्र संघाचे किरण पाटील, शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष केशव जाधव (शिवाजी पाटील), शिक्षक समितीचे नेते उदय शिंदे व राज्याध्यक्ष विजय कोंबे, राजन कोरगावकर, पुरोगामी शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष प्रसाद पाटील, शिक्षक परिषदेचे राज्याध्यक्ष राजेश सुर्वे, आदर्श शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष शिवाजीराव साखरे, शिक्षक सेनेचे चिंतामणी वेखंडे, शिक्षक भारतीचे राज्याध्यक्ष नवनाथ गेंड, पदवीधर शिक्षक संघटनेचे अनिल पलांडे, मनोज मराठे, पंजाबराव देशमुख संघटनेचे राज्याध्यक्ष प्रभाकर झोड, कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे राज्य सरचिटणीस सतिश कांबळे, स्वाभिमानी शिक्षक संघटनेचे यादव पवार, शिक्षक सहकार संघटनेचे निलेश देशमुख, ऊर्दू शिक्षक संघटनेचे साजीद अहमद, जुनी पेन्शन संघटनेचे तुषार पाटील व शहाजी गोरवे, एम एड कृती समितीचे राजू सावकार जाधव, इब्टा शिक्षक संघटनेचे उतरेश्वर मोहलकर, राज्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य शिक्षक समन्वय महासंघ मधुकर काटोळे, एकल शिक्षक सेवा मंच राज्याध्यक्ष विकास खांडेकर, पल्लवी गायकवाड, प्रकाश घोळवे, अंकुश काळे, पवन सुर्यवंशी, एस के पाटील, संजय जाधव, तुषार पाटील, शशिकांत पोवार आदी सर्व संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

     राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने उपरोक्त दोन्ही शासन निर्णय रद्द करावे,तसे न झाल्यास येत्या २५ सप्टेंबर ला राज्यातील सर्व शिक्षक सामुहिक रजेवर जाणार असल्याची माहिती अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष धनराज बोडे यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

विसर्जनावरून कन्हानवासींचा नगरपरिषदेवर रोष

Thu Sep 19 , 2024
विसर्जनावरून कन्हानवासींचा नगरपरिषदेवर रोष कन्हान, ता. १८ः     दहा दिवस मनोभावे पूजा अर्चना केल्यानंतर विसर्जनस्थळी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेश असल्याचे सांगून नगरपरिषदेने केलेल्या व्यवस्थेत अनेक चुका असल्याच्या कारणावरून भक्तांनी रोष व्यक्त केला.               विसर्जनस्थळी लावण्यात आलेला पोलिस बंदोबस्त कन्हान शहर व ग्रामीण भागामध्ये सातसे ते […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta