भारत शिक्षा रतन पुरस्काराने सन्मानित डॉ.बेले
नागपूर : ऐकॉनॉमिक्स ग्रोथ फाऊंडेशन, नवी दिल्ली यांच्याकडून शैक्षणिक क्षेत्रातील समर्पण, अपवादात्मक योगदान, उल्लेखनीय कामगिरी आणि भूमिकेबद्दल, ऐकॉनॉमिक्स ग्रोथ फाऊंडेशन, दिल्ली द्वारे शिक्षकांना सन्मानित केले जाते.
भारत शिक्षा रतन पुरस्कार 2023 मध्ये डॉ. आकाश जयदेवराव बेले यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
डॉ.बेले हे मुळचे उमरेड ग्रामीण भागातील असुन त्यांचे बारावी पर्यंतचे शिक्षण उमरेड व उच्च शिक्षण नागपुरात झाले आहे. डॉ बेले हे यू.जी. तसेच पी.जी. वाणिज्य विषयात ते सुवर्णपदक विजेते असून त्यांनी विद्यापीठ स्तरावर सुधारात्मक दृष्टिकोनातून वाणिज्य विषयांतर्गत ५० हून अधिक पुस्तके प्रकाशित केली आहेत. या पुस्तकांचा विद्यापीठांच्या अभ्यासक्रमाचा समावेश करण्यात आला असून विद्यार्थ्यांना त्यात रस आहे.
त्यांना या आधी विविध शैक्षणिक आणि सामाजिक पुरस्कार, मिळालेले असुन याच वर्षी आविष्कार फाउंडेशन तर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार 2023, म.का.क केंद्र – महा. शासना तर्फे तरुण मनाचा कवी आणि राजश्री शाहू महाराज सन्मान पुरस्काराने गौरव केला आहे.
सध्या ते कॉमर्स कॉलेज, वर्धा येथे प्राध्यापक आहेत.याचे श्रेय त्यांनी प्राचार्य डॉ.अरुंधती निनावे, पर्यवेक्षक प्रवीण ठाकरे यांच्यासह त्यांचे कुटुंबीय, मित्रपरिवार यांना दिले आहे.
Post Views: 710
Wed Oct 18 , 2023
प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय सावनेर तर्फे चैतन्य नवदुर्गा दर्शन संजीव झाकी चे आयोजन नेहरू मार्केट बस स्थानक सावनेर येथे करण्यात आले आहे. सावनेर : आदिशक्तीच्या शाश्वत वैभवाचे मोठेपण भारताच्या वैभवाच्या कथांमध्ये प्रथम स्थान घेते. दरवर्षी प्रजापिता ब्रह्मा कुमारी ईश्वरी विद्यापीठातर्फे ही गौरवगाथा जिवंत झांकीच्या रूपात सांगितली जाते.भारतालाच नव्हे तर संपूर्ण […]