छत्तीसगड च्या कुम्हाली संघ स्व.संजय नायडु ट्रॉफी विजेता
वेकोली गोंडेगाव खदान मैदानावर क्रिकेट स्पर्धेत २० राज्यातील संघ सहभागी.
कन्हान,ता.१६ डिसेंबर
वेकोली गोंडेगाव खुली खदान मैदानावर सनसुई क्रिकेट क्लब गोंडेगाव यांच्या वतीने तीन दिवसीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत छत्तीसगड च्या कुम्हाली संघाने अंतिम सामना जिंकत स्व.संजय नायडु ट्रॉफी विजेता ठरला .
स्व.संजय नायडु यांच्या स्मरणार्थ आयोजित स्पर्धेत विविध राज्यातील वीस संघांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेतील पहिला उपांत्य फेरी सामना डीएनए कामठी विरूध्द अजनी इलेव्हन नागपुर चा झाला. ज्या मध्ये डीएनए कामठी च्या संघाने बाजी मारली. दुसरा उपांत्य फेरी सामना प्रतीक इलेव्हन विरूध्द छत्तीसगढ़ च्या कुम्हाली इलेव्हन मध्ये झाला. यात कुम्हाली इले व्हन ने बाजी मारली. स्पर्धेचा अंतिम सामना डीएनए कामठी विरूध्द कुम्हाळी संघा मध्ये झाला. यात प्रथम फलंदाजी करताना कुम्हाळी संघाने ८ षटकात ९ गडी गमावित १०४ धावा केल्या. अमित यादव च्या १३ चेंडु त ३२ धावा आणि राजेश कुमार च्या ११ चेंडुत २८ धावांचा समावेश होता. १०५ धावांचा पाठलाग करतां ना डीएनए संघ ८ षटकांत ४ गडी गमावुन केवळ ८७ धावाच करू शकला. अशा प्रकारे हा अंतिम सामना छत्तीसगढ़ च्या कुम्हाळी संघा ने जिंकत स्व.संजय नायडु ट्रॉफी विजेता ठरला.
पारितोषिक वितरण समारंभाचे अध्यक्ष स्थानी वेकोलि गोंडेगाव उपक्षेत्रीय व्यवस्थापक राजेंद्र ठाकरे होते. याप्रसंगी रुद्र ट्रान्सपोर्टचे संचालक बंटी आकरे, टिपु सिंग, वरिष्ठ पत्रकार अजय त्रिवेदी, अनिल सिंग आदीं प्रामुख्याने उपस्थिती होते. यावेळी विजेत्या छत्तीसगड च्या कुम्हाली संघाला शिल्ड, विजेता चषक आणि रुद्र ट्रान्सपोर्टचे रोख ७१ हजार रूपये, तर उप विजेत्या डीएनए संघाला ५१,००१ रुपयांचे बक्षीस देण्यात आले. मॅन ऑफ द मॅच अमित यादव, बेस्ट मॅन नंदु बोरकर, बेस्ट बॉलर राकेश यादव, बेस्ट फिल्ड र घनश्याम आणि मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार छत्तीसगड च्या शोबीला मॅच मध्ये उत्कृष्ट कामगिरी साठी देण्यात आला. स्पर्धेच्या यशस्वीतेकरिता समिती सदस्य उमेश पाल, प्रीतम सिंग, रोहित डोंगरे, सतीश गुप्ता, अनुज कांबळे, गौरव भोयर, वैभव भोयर, जसवंत, अरविंद यादव आदी ने सहकार्य केले.
Post Views: 174
Fri Dec 16 , 2022
अवैधरित्या तलवार घेऊन फिरणाऱ्या युवकाला अटक कन्हान,ता.१३ डिसेंबर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील केमीकल ग्राउंड कन्हान येथे अवैधरित्या लोखंडी तलवार घेऊन फिरणाऱ्या युवकांकडून तलवार जप्त करुन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. प्राप्त माहिती नुसार सोमवार (दि.१२) डिसेंबर रोजी रात्री १० ते १०:३० वा. च्या दरम्यान शैलेश राजाराम वराडे हे आपल्या स्टाॅप […]