चंद्रपाल चौकसे यांच्या हस्ते भजन गायिका अरुणा बावनकुळे यांचा सत्कार
नागपूर,ता.१७ फेब्रुवारी
जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील तुडका या गावी विदर्भ स्तरीय सांस्कृतिक कला महोत्सव 2023 चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तिन अंकी संगीत नाटक “हंबरते वासराची माय” प्रसिध्द नाटकाचे सर्वांनी भरपूर कौतुक केले आणि श्रोते मंत्र मुगद्य झाले.
रामटेक विधानसभा क्षेत्राचे कॉग्रेस नेते चंद्रपालजी चौकसे (अध्यक्ष राष्ट्रीय पंचायती राज ग्रामप्रधान सरपंच संघटन महाराष्ट्र राज्य तथा पर्यटक मित्र रामटेक) यांनी भेट दिली. चंद्रपाल चौकसे लोकसेवा प्रतिष्ठान रामधाम (मनसर) तर्फे भजन गायिका अरुणा बावनकुळे यांचे शाल सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आले.
प्रसंगी वयोवृद्ध कलावंतांचे सत्कार करण्यात आले. यावेळी माजी आमदार अनिल बावनकर, माजी आमदार चरण वाघमारे, कार्यक्रमाचे आयोजक शाहीर राजेंद्र बावनकुळे, केंद्रीय अध्यक्ष भारतीय कलाकार शाहीर मंडळ कामठी, शाहीर गणेशराम देशमुख, सर्वस्तरिय कलाकार संस्था तुमसर, शाहीर वसंता कुंभरे, करंट कलाकार संस्था लाखनी. शाहीर भगवान लांजेवार, अरुण मेश्राम, चिरकुट पूंडेकर, गजानन वडे, भीम शाहीर प्रदीप कडबे,शिशुपाल अतकरे,भगवान वानखेडे, मधुकर शिंदेमेश्राम, महादेव पारसे, रायबान करडभाजने, वासुदेव नेवारे, श्रावण लांजेवार, चंद्रकला गिरहे, कृष्णा वानोडे व गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post Views: 189
Fri Feb 17 , 2023
१९ फेब्रुवारी ला राजे शिवराय जयंती महोत्सव कन्हान,ता.१७ फेब्रुवारी मराठा सेवा संघ कन्हान व्दारे राजे छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्य क्रिडा क्षेत्रात प्राविण्य प्राप्त विद्यार्थी व मान्यवरांचा सत्कार करून राजे शिवराय जयंती महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती महोत्सव रविवार […]