न.प.उपाध्यक्ष योगेंद्र रंगारी यांनी अनधिकृत बांधकाम करून पदाचा दुरुपयोग
कन्हान,ता.१७ एप्रिल
कन्हान नगर परिषद अंतर्गत प्र.क्र.५ मधील रहिवासी योगेंद्र (बाबू) रंगारी यांनी शासकीय सांडपाण्याच्या नालीवर अनाधिकृत बांधकाम करून कन्हान न. प. उपाध्यक्ष पदाच्या दुरुपयोग करून शासकीय नियमाच्या उल्लंघन केल्याचा आरोप कन्हान नगराध्यक्ष सौ.करूणाताई आष्टणकर यांनी नागपूर जिल्हाधिकारी यांना तक्रार केली आहे.
उपाध्यक्ष योगेंद्र रंगारी यांनी न प. कन्हान-पिपरी च्या मालकीच्या / शासकीय नालीवर बांधकाम करून अतिक्रमण करित आहे. हि बाब नियमबाह्य व दंडनीय आहे.अतिक्रमणामुळे शासकीय नाली हि पूर्णपणे बुझल्याने त्याठिकाणी सांडपाण्याचा विसर्ग होण्यास अडथळा होत आहे. तसेच त्या ठिकाणी घाणीचे वातावरण निर्माण झाल्याने नागरिकांना आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे नालीवरील अतिक्रमण काढून नाली मोकळी करणे अत्यंत गरजेचे आहे. याकरिता प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देवून याठिकाणी मोका चौकशी करून लवकरात लवकर नालीवरील अतिक्रमण काढण्यात यावे तसेच उचित कार्यवाही करण्यात यावी. कशी तक्रार जिल्हाधिकारी व न.प.मुख्यधिकारी यांना केली आहे.
……..
न.ग.उपाध्यक्ष योगेंद्र रंगारी
सदर जागा ही माझे वडिलोपार्जित असून मागचे बाजूला १.५ फूट जागा सोडलेली आहे. त्या जागेतून नाली बनलेली असून वरती स्लॅब आहे. नाली सफाई करिता कुठलीही अडचण नाही. जेव्हा नालीवरती पायरी बनवलेली होती तेव्हा मी न.प.चा पदाधिकारी नव्हतो. आता ती पायरी तोडण्यात आली. मी ई -रिक्षा खरेदी घोटयाळाची तक्रार केली. त्यावरून लक्ष हटवण्या करिता ही तक्रार करण्यात आली.
Post Views: 1,073
Wed Apr 19 , 2023
भारतीय संविधानाचे रक्षण करणे ही आपली जबाबदारी – ॲड. चंद्रशेखर बरेठिया दोन दिवसीय भीम जन्मोत्सवाचा थाटात समारोप सावनेर – डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अथक परिश्रमातून भारतीय संविधान निर्मिती झाली आणि खऱ्या अर्थाने देशात देशात लोकशाही प्रस्थापित झाली. सामाजिक, आर्थिक, राजनीतिक व व्यक्तिस्वातंत्र्य असणारी समता, स्वातंत्र्य, बंधुता निर्माण करून अखंड भारतातील सर्व […]