*चारगाव मधील पाझर तलावाच्या कामाला सुरुवात*
*सिंचनासाठी पाणी मिळणार असल्याने शेतकऱ्यांना दिलासा*
पारशिवनी (ता प्र):-पारशिवनी तालुक्यातील कुवारा भिवसेन मार्गावरील धारगाव येथील पाझर तलावाच्या कामाला सुरुवात झाल्याने आता सिंचनासाठी मुबलक पाणी मिळणाऱ्या परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे .
चारगाव येथील पाझर तलावाचे काम गेल्या अनेक वर्षापासून अपूर्ण अवस्थेत होते एकीकडे चारगाव मकरधोकडा येथील शेतकऱ्यांची जवळपास 70 एकर जमीन 1995 मध्ये तलावाच्या निर्मितीसाठी शासनातर्फे अधिग्रहित करण्यात आली आली होती मात्र अनेक शेतकऱ्यांना शेतीच्या पूर्ण मोबदलाही मिळाला नव्हता तलावाचे काम हे अपूर्ण असल्याने पाणी साठवणूक करणे अशक्य असल्याने शेतीही सिंचनापासून वंचित होती त्यामुळे अपूर्णावस्थेत असलेल्या हा पाझर तलाव काहीच उपयोगाच्या नव्हता.
दरम्यान शेतकऱ्यांनी प्रहार जनशक्ती चे तालुकाप्रमुख आकाश दिवटे, चंद्रशेखर राऊत, राधेशाम नखाते यांचे माध्यमातून प्रहार जनशक्ती संघठनचे नागपूर जिल्हा प्रमुख श्री रमेश कारेमोरे यांच्यापर्यंत आपली व्यथा पोहोचविली यावर श्री रमेश कारेमोरे यांनी सिंचन विभागाकडे हा विषय लावून ठरला तसेच कार्यकारी अभियंता ,उपविभागीय अभियंता यांच्याकडे सतत का कागदोपत्री पाठपुरावा आंदोलनाचा इशारा सिंचन विभागाला दिला विभागास दिला श्री रमेश कारेमोरे यांच्या साततच्याचा पाठपुरावा मुळे सिंचन विभागाने तलावाच्या उर्वरित बांधकाम साठी 65 लक्ष रुपये निधीचे अंदाजपत्रक तयार करून या पाळ बांधकाम ,ओवरफ्लो गेट ,बेस्ट वेअर चे काम ,पिचिंग चे काम ,आदी कामांचा समावेश करून निविदा प्रक्रिया कामास सुरुवात केली दरम्यान श्री रमेश कारेमोरे यांच्यासह पारशिवनी तालुका प्रमुख जनशक्ती प्रहारचे आकाश दिवटे, चंद्रशेखर राऊत ,राधेशाम नखाते,प्रयास ठवरे ,सत्रुधन बेंद्रे ,श्यामा गोंलंगे,.आदींनी तलावाच्या सुरू असलेल्या कामाची पाहणी करून समाधान व्यक्त केले.