लॉकडाऊनमुळे खाजगी शाळेची शिक्षण शुल्क (फी) माफ करावी.
#) मा शिक्षणाधिकारी नागपुर हयाना निवेदन देऊन पालकांची मागणी.
कन्हान : – वाढता कोरोना प्रादुर्भाव रोखण्या करिता राज्यात लॉकडाऊन लावण्यात आल्याने मार्च २०२० पासुन सर्वच कामधंदे, व्यवहार बंद होते. तसेच शाळा सुध्दा बंद असुन अर्धवट ऑनलाईन शिक्षणा मुळे शालेय विद्यार्थाचे भयंकर नुकसान झाले. तरी सुध्दा खाजगी शाळा फी भरण्यास तगादा लावत असल्याने मा. शिक्षणाधिकारी नागपुर याना निवेदन देऊन शाळे ची शिक्षण शुल्क (फी) माफ करण्याची मागणी करण्यात आली आहे.
नागपुर जिल्हा शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी मा चिंतामण वंजारी साहेब यांची भेट घेऊन मागील मार्च २०२० पासुन एक वर्षापेक्षा जास्त कालावधीत कोव्हीड -१९ कोरोना विषाणु महामारी प्रादुर्भाव रोख ण्याकरिता राज्य सरकारने लॉकडाऊन लावल्याने संपूर्ण राज्यात तसेच कन्हान शहरातील सर्व खाजगी शाळा बंद असुन खाजगी शाळेने अर्धवट ऑनलाईन स्वरूपात अभ्यासक्रम सुरू केला. त्यामधे प्राथमिक विद्यार्थाना काही समजतही नव्हते. अशामध्ये खाजगी शाळेने शिक्षण शुल्क फी वसुलीचा पालकांना फोन द्वारे तगादा लावला आहे. एकीकडे सर्व प्रकारचे काम धंदे बंद, कुंटूबाचे उदरनिर्वाह करणे पालकांना कठीण झाले असुन मुलांची खाजगी भरमसाठ वाढीव शिक्षण शुल्क (फी़) कशी काय भरावे ? या ज्वलंत समस्येचा प्रश्न पालका सामोर निर्माण झाला आहे. ह्या सबंधीत विषयाचे गांभीर्याने लक्ष केंद्रीत करून लॉकडाऊन मुळे खाजगी शाळेचा शिक्षण शुल्क (फी) माफ करण्यात यावी अशी मागणी निवेदन देऊन प्रशांत बाजीराव मसार, मिलींद मेश्राम हयांनी पालक वर्गा कडुन केली आहे.