स्वातंत्र्य टिकवून ठेवायचे असेल तर समस्यांना मुळातूनच नष्ट केल्या पाहिजे- नरेंद्र वाघमारे
कन्हान,ता.१५
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारत देशाने अनेक क्षेत्रात प्रगती केली आहे. विज्ञान व तंत्रज्ञान, कृषी, आरोग्य, शिक्षण व वाहतूक अशा अनेक क्षेत्रात नेत्रदीपक प्रगती केली आहे. परंतु त्याचबरोबर अनेक समस्या ही आपल्या देशाला भेडसावत आहे.
महागाई, भ्रष्टाचार, जातीवाद, व्यसनाधीनता, अत्याचार या सर्व समस्या आवासून आपल्यासमोर उभे आहेत.अनेक अडचणींवर मात करत आपण स्वातंत्र्य मिळवले आहे. हे स्वातंत्र्य टिकवून ठेवायचे असेल तर आपण या समस्यांना सामोरे जाऊन या समस्या मुळातूनच नष्ट केल्या पाहिजे. तरच, आपला भारत देश सुजलाम सुफलाम बनेल असे शाळेचे संचालक नरेंद्र वाघमारे यांनी स्वातंत्र्यदिन विद्यार्थ्यांना भाषणांतून सांगितले.
श्रीमती हिराबाई उच्च प्राथमिक शाळा कन्हान येथे (दि. १५ ) ऑगस्ट रोजी गुरुवार ला श्रीमती हिराबाई उच्च प्राथमिक शाळा कन्हान येथे स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. शाळेचे संचालक नरेंद्र वाघमारे यांचा हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम घेण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे सचिव वंदना रामापुरे, तसेच पारधी तसेच हिराबाई वसतिगृहाचे अधीक्षक गणेश रामापुरे उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन कु.नेहा गायधने यांनी केले तर प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक हेमंत वंजारी यांनी केले. प्रसंगी आभार प्रदर्शन पवन ठमके यांनी केले. तसेच कार्यक्रमाला भास्कर सातपुते, पवनकुमार ठमके, अभिषेक मोहनकर, जयश्री पवार, मंदाकिनी रंगारी, कीर्ती वैरागडे, गीता वंजारी, योगिता चांदेवार आणि शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. शेवट विध्यार्थ्यांना अल्पहार देऊन कार्यक्रमची सांगता करण्यात आली.
Post Views: 650
Sat Aug 17 , 2024
राजे फॉउंडेशन व्दारे शाळेतील विद्यार्थ्यांना बुट व मोजे वाटप कन्हान,ता.१६ १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी शाळेतील विद्यार्थ्यांना बूट व मोजे घालुन शिस्तीत स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करता यावा. या सार्थक हेतुने राज फॉऊंडेशन, कन्हान व्दारे पंडित जवाहारलाल नेहरू विद्यालयातील गरजु शंभर विद्यार्थ्याना बूट व मोजे वाटप करण्यात आले. […]