राजे फॉउंडेशन व्दारे शाळेतील विद्यार्थ्यांना बुट व मोजे वाटप
कन्हान,ता.१६
१५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी शाळेतील विद्यार्थ्यांना बूट व मोजे घालुन शिस्तीत स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करता यावा. या सार्थक हेतुने राज फॉऊंडेशन, कन्हान व्दारे पंडित जवाहारलाल नेहरू विद्यालयातील गरजु शंभर विद्यार्थ्याना बूट व मोजे वाटप करण्यात आले.
स्वातंत्र्य दिन उत्साहाने थाटात साजरा करित असताना समाजातील काही संस्था अशा पण आहेत ज्या आपला आनंद दुसऱ्यां सोबत साजरा करतात.
अशीच कन्हान ची राजे फॉउंडेशन संस्था दरवर्षी १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधुन शाळेतील विद्यार्थ्यांना बुट व मोजे वाटप करित असतात. याच अनुसंगाने यावर्षी सुध्दा बुधवार (दि.१४) ऑगस्ट रोजी राजे फॉउंडेशन व्दारे पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय कन्हान येथिल शाळेच्या गरजु १०० विद्यार्थ्याना बूट (जुते़) व मोजे राजे फॉउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष केतन भिवगडे, निलेश गाडवे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
प्रसंगी नितीन बुराडे, अभिजित चांदुरकर, संतोष तुप्पट, संगिताताई मेंढे, महिमा शेंडे, रोशन सोनटक्के, रितेश जनबंधु, अमर मोहबे, शुभम चहांदे, शुभम येवले, रोहित गजभिये आदींनी प्रामुख्याने उपस्थित राहुन विद्यार्थ्यांना बुट व मोजे वाटप करण्यास सहकार्य केले. कार्यक्रमास शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षिका, कर्मचारी वृंद आणि विद्यार्थी बहु संख्येने उपस्थित होते.
Post Views: 646
Wed Aug 21 , 2024
कामठी वकील संघावर ॲड.डी.सी.चहांदे यांचे निर्विवाद वर्चस्व अध्यक्षपदी ॲड.अविनाश भिमटे आणि सचिव पदावर ॲड.प्रवीण गजबे विजयी नागपूर,ता.२० नागपूर जिल्ह्यातील सर्वात मोठी, अग्रणी आणि प्रतिष्ठित असलेल्या कामठी वकील संघावर ॲड.डी. सी.चहांदे यांच्या नेतृत्वातील पॅनलने सर्व नऊ जागा जिंकत निर्विवाद वर्चस्व कायम केले आहे. कामठी वकील संघाच्या […]