*झाल झाल सोड आता मला,नको मारू माफ कर मला!
* कर्तव्य दक्ष पोलिस शिपायावर वर प्राणघातक हल्ला
* हल्ल्याने शहरात पुन्हा एकदा गुंडप्रवृतीने डोके वर काढल्याचे चित्र
कन्हान ता.17 :कन्हान परिसरात गहूहिवरा चौक तारसा रोड येथे दि.16 सप्टेंबर रोजी बुधवार सांयकाळी नऊचा सुमारास पोलिस शिपायावर गुंडप्रवृतीचा युवकानी जुण्या वादाच्या सूड घेत धारधार चाकुने प्राणघातक हल्ला करून जख्मी केले .
कन्हान पोलीस ठाण्यात कर्तव्यदक्ष असलेले रवी चौधरी ( वय 44) रा.खसाळा यांना सांयकाळी पोलीस स्टेशन कन्हान येथे दूरध्वनी वर सांगितले की, एक अनुचित प्रकार एम.जी. नगर वार्डात घटना घडली आहे .याचा तपास करण्यासाठी रवी चौधरी गेले असता आरोपी कमलेश मेश्राम , अमन खान आणी त्याचे साथीदारानी कट रचून रवी चौधरी शिपाई याला वाटेत अडवत शाब्दिक चकमक केली. याआधी सोमवारी रात्री सिहोरा घाटातुन वाळु चोरी करणार्या ट्रॅक्टरवर पोलीसांनी कार्यवाही केली होती .यात कमलेश मेश्राम याचा भावाला पोलीसांनी अवैध व्यवसायाचा संशयात मध्ये रात्री ठाण्यात आणून चोप दिला तेव्हा रवी चौधरी उपस्थित होते.
यावेळी प्रतिबंधक कारवाई करीत रात्री आरोपीचा भावाला सोडल्या गेले. मिळाल्या माहीती नुसार सिहोरा घाटातुन अवैधरित्या वाळु वाहून नेणार्या वाहनावर कारवाई केली होती. तसेच भावाला ठाण्यात आणून चोप दिल्याने रवी चौधरी याचा हात असल्याचे मनात राग बाळगत बदल्याचा भावनेतुन वाट अडवत शीव्यागाळी करून दमदाटी व धमकावल्याने रवी चौधरी याना काही अनुचीत प्रकार आपल्या सोबत घडवण्याचे लक्षात येताच त्यानी पड काढला पण आरोपी कमलेश मेश्राम व अमन खान यांनी काही अंतरावर पाठलाग करीत रवी चौधरी याना काही न कळताच आरोपी कमलेश मेश्राम यांनी चाकुने पोटावर एका मागुन एक वार करीत रक्ताचा बंबाड करीत घटनास्थळावरून आरोपी व त्याचा सोबत असलेले साथी दारानी पड काढला. सायंकाळी नऊचा सुमारात रस्त्यावर आवाजावी असल्याने कन्हान शहरातील नागरीक गर्दी करीत बघाची भुमीका घेत. कुणीही चौधरी पोलिस कर्मचारी आरोपी पासून सोडवाला समोर आले नाही. घटनेची
माहिती पोलिस स्टेशन मिळताच जखमी अवस्थेत पोलीसांनी रवी याला आशा रूग्णालय कामठी येथे नेले पंरतु प्रकृती गंभीर असल्याने त्याला तात्काळ खाजगी व्होकार्ट रुग्णालय नागपूरला हलविण्यात आले.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेत रात्री ग्रामीण पोलीस अधिक्षक राकेश ओला व उपअधिक्षक मोनीका राऊत व ग्रामीण एल सी बी घटनास्थळी दाखल होऊन चारही बाजूंनी आरोपींना अटक करण्याकरीता टीम तयार करून रात्री उशीरापर्यंत शोध घेत होते मात्र अद्याप आरोपी अटक झाले नाही. सुदन्य नागरीकांचा मते याप्रकाराने गुंडप्रवृतीचा लोकांनी परत एकदा डोके वर काढल्याचे दिसतात. पोलीसाचा व महसूल विभागातील अधिकारी मुळे वाळु चोरीला उत आला असुन रात्री अवैध व्यवसायाला सुरवात होत असल्याचे दबक्या आवाजात नागरीक बोलत आहे.