*आँनलाईन सहयोग शिक्षक प्रशिक्षण शिबीरस उत्सफुर्त प्रतिसाद*
*महिला पतंजलि जिल्हा समीती नागपूर चा उपक्रम*
*नागपूर सह महाराष्ट्र, मध्यप्रदेश, छत्तीसगढ,बेंगलोर नोयेडा वरूण प्रशिक्षणार्थी सहभागी*
सावनेर : नागपूर महिला पतंजलि योग समिती व्दारे जिल्हा पतंजलि योग समीती व युवा भारत च्या सहकार्यांने सुरू असलेल्या आँनलाईन सहयोग शीक्षक प्रशिक्षण शीबीरस प्रशिक्षणार्थी तसेच पतंजलि राज्य व केन्द्रीय समीती पतंजलि योग पीठ हरिव्दार व्दारे सुरू असलेले शिबार उत्कृष्ट रित्या संचालीत होत असल्या बाबत प्रशंसा केली जात आहे.
नागपूर जिल्हा महिला प्रभारी उर्मिला जुवारकर यांच्या प्रयत्नानी तसेच राज्य प्रभारी शोभा भागीया,जीला प्रभारी छाजुराम शर्मा,पंकज बांते व पदाधिकारी आदिंच्या सहकार्याने सुरु असलेल्या 25 दिवस सकाळ संध्याकाळ चालणाऱ्या या शिबीरगस जिल्हा व राज्याचे तज्ञ योग शिक्षक,राज्य व केन्द्रीय प्रभारी यांचे सुद्धा मार्गदर्शन प्राप्त होत असुन योग,प्राणायाम, आसान,आहार,अध्यात्म व संस्कार इत्यादी ची इतंभू माहीती शेकडो शिबिरार्थी दररोज प्राप्त करूण आपले जीवन सहज व निरोगी जगण्याचे सुत्र अंगीकृत करत आहेत.
मागील विस दीवसापासुन सुरु असलेल्या या सहयोग शिक्षक प्रशिक्षणचे दि. 16 अक्टोंबर ला सकाळच्या सत्राची सुरुवात वरिष्ठ पत्रकार अमरचंद जैन व सौ.जैन ताई व्दारे दिप प्रज्वलन करूण संचालन सावनेर तालुका प्रभारी किशोर ढुंढेले व महीला प्रभारी लता ढवळे यांनी करुण योग प्राणायाम, योगींक जाँगींग,सुर्य नमस्कार, ताडा़सन,वुक्षासन,मकरासन,भुजंगासन,नौकासन,वज्रासन,सर्वांगासन इत्यादीदी आसन व आहार संबंधितची सुक्ष्म माहीती शिबिरार्थ्यांना दीली.
कोरोनाच्या या महामारीत योगऋषी स्वामी रामदेव व्दारे समस्त देशवासीयांन सोबतच संपुर्ण विश्वला योग प्राणायाम व्दारे निरोगी ठेवण्यासाठी परिश्रम घेत आहेत. त्याच प्रमाणे संपूर्ण देशात पतंजलि योग समितीचे पदाधिकारी आँनलाईन सहयोग शिक्षक प्रशिक्षण शिबीर लावून योग प्राणायाम, अध्यात्म व संस्कार घरो घरी पोहचवीत आहेत.
दि 28 सप्टेंबर पासून सुरु असलेल्या या 25 दिवसीय शिबीराच्या यशस्वीते करिता राज्य कार्यकारनी सदस्य शशिकांत जोशी,राजेन्द्र जुवारकर,कमल गुप्ता डॉ.सरिता इंगळे,सुरेखा नवघरे,पराग जुवारकर, संगीता मिश्रा,रितु जरगर,विजया लांडे,माधुरी ठाकरे,चारु पाटील,अभिषेक जुवारकर, विनोद काळे,मास्टर सुजल घ्यार इत्यादी दी परिश्रम घेत आहेत.