तेली समाजाचा अपमान करणार्‍यावर कठोर कारवाई करण्याची मागणी

*गणेश चुक्कल वर कठोर कारवाई करण्याची मागणी*

#) संताजी ब्रिग्रेड तेली समाज महासभा (महाराष्ट्र) यांचे कन्हान पुलिस निरीक्षकांना निवेदन

कन्हान – गणेश चुक्कल याने तेली समाजाचा अपमान करणारे बॅनर लावुन तेली समाजाचा अपमान केल्याने संताजी ब्रिग्रेड तेली समाज महासभा (महाराष्ट्र) च्या पदाधिकार्यांनी उपाध्यक्ष महेंन्द्र भुरे यांचा नेतृत्वात व कन्हान – पिपरी नगरपरिषद नगराध्यक्षा सौ.करुणा आष्टणकर यांचा उपस्थिति मध्ये कन्हान पुलिस चे पुलिस निरीक्षक यांना एक निवेदन देऊन गणेश चुक्कल वर कठोर कारवाई ची मागणी केली अन्यथा तीव्र आंदोलन चा ईशारा दिला आहे.
निवेदनात सांगितले कि गणेश चुक्कल ह्याने उत्तरप्रदेश चे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ह्यांचा मुंबई सिनेसृष्टीशी संबंधित नट , उद्योजकांच्या मुंबई येथे भेटीच्या पार्शभुमीवर आल्याने संपुर्ण मुंबई त जागो – जागी तेली समाजाचा अपमान करणारे बॅनर लावुन तेली समाजाचा अपमान केला असुन ” कहा राजा भोज…. और कहा गंगु तेली….” ” कुठे महाराष्ट्रांच वैभव …. तर कुठे युपी चं दारिद्र ….” अश्या प्रकारांचे बॅनर लावुन तेली समाजाला थेट दारिद्र म्हटले असुन अश्या जातीवाचक टिप्पणी करुन गणेश चुक्कल ह्याने समस्त तेली समाजाच्या भावना दुखवल्या व संविधान नुसार आमच्या मुलभुत हक्कांचे हनन केले असुन डॉ महेंन्द्र कुमार धावडे लिखित तेली समाजाचा इतिहास व संस्कृती हवा पुस्तकात संशोधन करुन खरी म्हण ” कहा राजा भोज , कहा विजेता गंगेय ” अश्या प्रकारच्या सुद्धा बॅनर लावुन गणेश चुक्कल याने गंगेय (गंगु) देवाचा सुद्धा अपमान केला असुन अश्या संतापजनक प्रकार करणारे गणेश चुक्कल यांचा वर कठोर कारवाई करण्यात यावी असे निवेदन
संताजी ब्रिग्रेड तेली समाज महासभा (महाराष्ट्र) च्या पदाधिकार्यांनी कन्हान पुलिस निरीक्षकांना दिले असुन तीव्र आंदोलन चा ईशारा सुद्धा दिला आहे .


निवेदन देतांना संताजी ब्रिग्रेड तेली समाज महासभा (महाराष्ट्र) चे उपाध्यक्ष महेंन्द्र भुरे , कन्हान – पिपरी नगरपरिषद चे नगराध्यक्षा सौ.करुणा आष्टणकर , रामटेक विधानसभा युवक आघाड़ी अध्यक्ष अमोल साकोरे , ॠषभ बावनकर , कुबेर पोटभरे , विजय बावनकुळे यशवंत चामट आदि तेली समाजाचे नागरिक उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

कन्हान परिसरात चार रूग्णाची भर : कोरोना अपडेट

Thu Dec 17 , 2020
कन्हान परिसरात चार रूग्णाची भर   #) कन्हान ३, कामठी १ असे चार रूग्ण आढळुन कन्हान परिसर ९१२.   कन्हान : –  कोविड -१९ संसर्ग रोगाचा प्रादुर्भाव कमी होत प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे मुकबधिर शा ळा कांद्री ला (दि.१७) ला रॅपेट ५ व स्वॅब २४ अश्या २९ चाचणी घेतल्या यात कामठी चा एक व […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta