सत्तर गोवंश ला कन्हान पोलीसांनी दिले जीवदान
गोवंश सह एकुण ६,५६,००० रु. मुद्देमाल जप्त
कन्हान,ता.१७ फेब्रुवारी
पोलीस स्टेशन हद्दीतील सिहोरा शिवारात गोपाल नथ्थुजी कुंभलकर यांच्या शेतात ७० गोवंश मिळुन आल्याने पोलीसांनी एकुण ६,५६,००० रु. मुद्देमाल जप्त करुन गोवंश ला जीवनदान देऊन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलीसांच्या माहिती नुसार, गुरुवार (दि.१६) फेब्रुवारी ला दुपारी १:३० ते रात्री ११:३४ वाजता च्या दरम्यान पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर यांचा मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पोटभरे, अश्विन गजभिये, महेंद्र जळीतकर, संदीप गेडाम सह आदि कर्मचारी परिसरात पेट्रोलिंग करीत असतांना सिहोरा शिवारात गोपाल नथ्थुजी कुंभलकर रा.तुकाराम नगर कन्हान यांच्या शेतात आरोपी जिया कुरेशी ऐहसान कुरैशी रा.कामठी याने कत्तलीकरीता अवैधरित्या गोवंश बांधुन ठेवलेले आहे.
अशा विश्वसनीय माहिती वरुन, कन्हान पोलीसांनी कर्मचारी सह सिहोरा शिवारात गोपाल कुंभलकर यांचा शेतात घटनास्थळी पाहणी केली. त्यांचे शेतात झाडी झुडपा मध्ये गोवंश जातीचे (१)११ लहान गोरे, लाल काळ्या रंगाचे प्रत्येकी किंमत ६,००० रु प्रमाणे एकूण ६६,००० रु . (२)११ गायी लाल काळ्या पांढऱ्या रंगाचा प्रत्येकी किंमत १०,००० रु. प्रमाणे एकुण १,१०,००० रू. (३) ४८ मोठे गोरे व बैल लाल काळ्या पांढऱ्या रंगाचे प्रत्येकी किंमत १०,००० रु प्रमाणे एकुण किंमत ४,८०,००० असा एकुण ६,५६,००० रुपयांचे गोवंश जातीचे गोरे, बैल, मिळुन आले. गायींना निर्दय व क्रुरणने चारा पाण्याची व्यवस्था न करता. कत्ली करीता बांधलेले दिसुन आले. सदर घटनास्थळी शेतमालक गोपाल कुंभलकर आणि गोवंश मालक जिया कुरेशी मिळुन आले नाही.
पोलीसांनी पंचासमक्ष ७० गोवंश ला ताब्यात घेऊन सदर गोवंशाचे पालन पोषण करण्याकरिता ज्ञान फाऊंडेशन गौशाला बरडगिनी येथे दाखल करण्यात आले आहे. सदर प्रकरणा बाबत कन्हान पोलीसांनी सरकार तर्फे फिर्यादी पोशि अश्विन मधुकर गजभिये यांचा तक्रारी वरून गोपाल कुंभलकर व जिया कुरेशी एहेसान कुरैशी यांचा विरुद्ध कलम प्रान्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियन ११ (१) (ड), महाराष्ट्र प्राणी सरंक्षण अधिनियम ९,२,५अ अन्वये गुन्हा दाखल केला. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर यांचा मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक दिलीप पोटभरे, अश्विन गजभिये हे करीत असुन आरोपीचा शोध घेत आहे .
Post Views: 189
Sun Feb 19 , 2023
पोलीस तपासात राहुल सलामेच्या मृत्यूने कन्हान शहरात तणाव आदिवासी समाज बांधवांनी पोलिसांवर रोष व्यक्त करून कारवाईची मागणी कन्हान,ता.१९ फेब्रुवारी शहरातील आठवडी बाजारात तरुणांच्या टोळीने स्थानिक नागरिकांसह दुकानदारांवर तलवारीने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली होती. नागरिकांनी या घटनेचा विरोध करत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वर रास्ता रोको केल्याने तणावाची […]