मूकबधीर विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धा संपन्न.
सावनेर : मंगल बहुउद्देशीय शिक्षण,तांत्रिक शिक्षण व प्रशिक्षण संस्था नागपूर द्वारा संचालित मूक बधिर निवासी शाळा सावनेर च्या वतीने मूक बधिर विद्यार्थ्यांकरीता जिल्हास्तरीय आंतरशालेय बॅडमिंटन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धा क्रीडा संकुल सावनेर येथे संपन्न झाल्या.बॅडमिंटन स्पर्धेच्या उदघाटनाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रा डॉ.योगेश पाटील,संस्थेचे अध्यक्ष प्रशांत डवले,सचिव नारायण समर्थ,शाळेचे वैद्यकीय मार्गदर्शक डॉ.अमित चेडे,शाळेच्या प्रशासकीय अधिकारी मंगला समर्थ, मुख्याध्यापिका सुवर्णा महाशब्दे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.मान्यवरांच्या हस्ते फीत कापून स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले.
उद्घाटन प्रसंगी स्पर्धेचे दरवर्षी आयोजन करण्यामागची भूमिका नारायण समर्थ यांनी सांगितली डॉयोगेश पाटील यांनी मूक बधिर विद्यार्थ्यांच्या क्रीडा विकासाकरिता सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन देऊन स्पर्धेच्या आयोजनाबद्दल कौतुक केले. यावेळी संस्थेच्या वतीने डॉ योगेश पाटील यांचा सत्कार करण्यात आला.या स्पर्धेमध्ये पाच शाळांचे विद्यार्थी सहभागी झालेत.या स्पर्धा मुलांकरिता एकेरी व मुलींकरिता दुहेरी आयोजित करण्यात आल्या होत्या.या स्पर्धेत एकेरी मध्ये हिमांशू काटेखाये शंकर नगर विजेता,खुशाल बोबडे सोनुताई मूक बधिर उपविजेता तर रिजाय तांडेकर सावनेर तृतीय मुलींच्या दुहेरी स्पर्धेत कु.मनस्वी लाकडे व कु.समीक्षा वनारसे सावनेर विजेता, कु. डिम्पल मातिखाये व कु.नंदिनी महामल्ला कल्याण मूक बधिर उपविजेता तर कु.वेदिका मेहने व कु.तृप्ती गोहाड हुडकेश्र्वर तृतीय स्थान प्राप्त केले.समारोपीय कार्यक्रम शाळेच्या सभागृहात संपन्न झाला.यावेळी संस्थेचे सचिव नारायण समर्थ, प्रशासकीय अधिकारी मंगला समर्थ, शाळेचे वैद्यकीय मार्गदर्शक डॉ.अमित चेडे,मुख्याध्यापिका सौ सुवर्णा महाशब्दे, सोनुताई मूक बधिर शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती प्रगती उंबरकर,वसतिगृह अधीक्षक श्री राजू दलाल इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत विजेत्या स्पर्धकांना प्रमाणपत्र व वस्तू स्वरूपात पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व सामान्य ज्ञान पुस्तक देऊन सन्मानित केले तसेच क्रीडा प्रतिनिधी यांना प्रमाणपत्र देण्यात आले.स्पर्धेच्या आयोजनामध्ये सहभागी झाल्याबद्दल संस्थेचे सचिव श्री नारायण समर्थ यांनी सर्व शाळांचे अभिनंदन केले तसेच स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबद्दल शाळेतील सर्व शिक्षक व कर्मचारी यांचे कौतुक केले.क्रीडा प्रतिनिधी प्रगती उंबरकर यांनी स्पर्धा खूप चांगल्या पद्धतीने संपन्न झाल्याचे आपल्या मनोगतात सांगितले.कार्यक्रमाचे संचालन क्रीडा शिक्षक श्री संजय लुंगे यांनी केले तर शाळेच्या मुख्याध्यापिका सुवर्णा महाशब्दे यांनी आभारप्रदर्शन केले.या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.कार्यक्रमाला पालक,माजी विद्यार्थ्यांची विशेष उपस्थिती होती.खेळीमेळीच्या वातावरणात स्पर्धा संपन्न झाल्या.
Post Views: 753
Thu Mar 23 , 2023
लाचखोर अभियंता लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई पंधरा दिवसांत सावनेर नगर परिषदेत दुसरी कारवाई सावनेर : सावनेर नगरपालिकेचे प्रधानमंत्री आवास योजनेचे अभियंता नितीन मदनकर रा. नागपुर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तीस हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडल्याने नगर परिषद कार्यालयात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळलेल्या […]