अवैध एलपीजी गॅस सिलेडंर चालवतो ऑटो
नागपुरः एलपीजी सिलेंडरच्या गॅस ऑटोमध्ये अवैधरीत्या भरणारा युवकाला शांतीनगर पोलिसांनी खाक्या दाखवत सापडा रचुन अटक केली. घरात
मिनी वर्कशॉप उघडुन तो अवैधरीत्या गोरखधंधा करत होता. घटना शेख वसीम शेख हनीफ (35) मस्के ले-आउट, कावरापेठ आहे.
पो.उपनिरीक्षक अरूण यादवराव बकाल, पोलिस स्टेशन शांतीनगर यांना गुप्त बातमी मार्फत मिळाली आरोपी शेख वसीम वय 35 रा.मस्के ले आउट, कावरापेठ, शांतीनगर नागपुर हा घरगुती वापराचे गॅस सिलेंडर मधुन मोटर पंप व्दारे ऑटोमध्ये गॅस भरून देण्याचे काम करीत आहे अशा माहीती वरून पोलीस निरीक्षक जी. जे. जामदार यांचा मार्गदर्शनाखाली कार्यवाही केली असता आरोपी आपले राहते घराचे कंपाउडमध्ये घरगुती वापराचे एक एच. पी. कंपनीचे गॅस सिलेंडर मधुन तीन चाकी सवारी ऑटो क्र. एम .एच. 40/2463 चा उजव्या बाजुस ऑटोला लागलेले गॅस सिलेंडरला असलेल्या काॅकला पाईप जोडुन मोटर पंप मशिन ला ईलेक्टिक वायरने सप्लाय घेवुन गॅस भरत असताना दिसुन आला आरोपी पळुन जाण्याचा प्रयत्नात असताना त्यास स्टाॅपचा मदतीने पकडले. त्याचा कडून तीन चाकी ऑटो क्र.एम. एच. 40-2463 कीमत 80,000/- रूपये, एक एच. पी. कंपनीचा घरगुती वापराचा गॅस सिलेंडर किंमत 1000/-रुपये, एक मोटर पंप किंमत 2000/-रूपये असा एकूण 83000/- रूपयाचा मुद्देमालसह जप्त करण्यात आला. आरोपीला ज्वालाग्राही पदार्थ आहे असे माहीती असताना सुध्दा मानवी जीवन धोक्यात येईल अशी कृती असताना काळाबाजार करताना मिळुन आल्याने कलम 285 भादवी सह कलम 3,7 अत्यावश्यक वस्तु अधिनियम 1955 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.सदरची कामगीरी पोलिस उपआयुक्त लोहीत मतानी, सहा पो आयुक्त भुषन पंडीत, लगडगंज विभाग नागपुर यांचे मार्गदर्शनाखाली वपोनि जी जे जामदार, पोउपनि अरूण बकाल, पोहवा राजेश चंदेल, पोशि जितेश रेड्डी, पोशि राहुल, कनोजिया यांनी केली आहे.