ग्राम पंचायत आमडी व्दारे लसीकरणा करिता जन जागृती
कन्हान : – गट ग्राम पंचायत आमडी (हिवरी) अंतर्गत कोरोना विषाणु हद्दपार करण्याकरिता ४५ वयोगटा वरील सर्व स्त्री पुरूष नागरिकांचे लसीकरण करण्या करिता मोहीम राबवुन घरोघरी जाऊन व्हैक्सीन चे फायदे लाभार्थ्याना समाजवुन जनजागृती करण्यात आली.
सोमवार (दि.१७) ला सकाळी ८.३० वाजता पासुन गट ग्राम पंचायत आमडी (हिवरी) सरपंचा सौ शुभांगी राजु भोस्कर हयानी लसीकरण जनजागृती मोहीम अंतर्गत वार्ड क्रमाक १, २ व ३ अश्या तीन चंमु तयार करून घरोघरी जाऊन ४५ वर्ष वयोगटा वरील सर्व स्त्री, पुरूष लाभार्थी ज्यांनी व्हैक्सीनचा पहीला डोज घेतला नाही. तसेच ज्याना दुसरा डोज घ्यायचा आहे अशा सर्व लाभार्थ्याना कोरोना विषाणु पासुन बचाव करण्यास व्हैक्सीनचे महत्व व फायदे समाजा वुन सांगुन मार्गदर्शन करण्यात आले. या मोहीमेत सरपंचा शुभांगी भोस्कर, ग्रामसेवका मोरे मॅडम, उप केंद्र आमडी आरोग्य अधिकारी डॉ तिवारी, आमडी तलाठी, समाजसेवक राजु भोस्कर, केंद्र प्रमुख अनिल यादव सर, मुख्याध्यापिका शिला जैस्वाल, शिक्षिका ललिता वानखेडे, सुनैना लेनगुरे, भाग्यश्री गभणे, अंग णवाडी सेविका वनिता सय्याम, मदतनिस मिरा उपरेड, आशा वर्कस अर्चना खडसे, सुनिता मोहने, ग्रा प कर्म चारी संजय बगमारे, राजकिरण सोनवाणे आदीने सहभागी होऊन वारंवार हाथ स्वच्छ धुणे, मॉस्क चा वापर करणे, सामाजिक अंतरांचे पालन करित शासना च्या नियमाचे काटेकोरपणे पालन करणे तसेच नागरिकांना लसीकरणास प्रवृत्त करून यशस्विरित्या जनजागृती करण्यात आली.