*शेकडोवर्षापासून प्रथा राबवत शेतकरीबांधवांनी पार पाडला पोळा..*
सावनेर:- कोरोणाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी बांधवांनी शेकडो वर्षापासून प्रसिद्ध असलेल्या स्थानिक पोळा मैदान येथे पोलिसांच्या बंदोबस्तात सामाजिक अंतर ठेवून व बैल जोड्याची लोकांची गर्दी न व्हावी म्हणून बंदोबस्त करण्यात आला या वेळी गावातील शेतकरी बांधव आपल्या बैल जोड्या सोबत आले..पोळा मैदानात असलेल्या मारूतीच्या मंदिराच्या वेळा घालून या वेळी नगरसेवक व पत्रकार बांधवांनी बळीराजा ला दुपट्टा व श्रीफळ देण्यात आले पोलिसांच्या बंदोबस्त असल्याने दरवर्षी प्रमाणे या पोळा मैदानात एक मोठा उत्साह नागरिकांत व शेतकऱ्यां मध्ये असायचा कॅबिनेट मंत्री सुनील केदार दरवर्षी शेतकऱ्यांना दिलासा देऊन त्याचा आत्मविश्वास वाढून भाषण द्याचे परंतु यंदा बैल पोळ्या ला कोरोणाचा प्रादुर्भाव ला लक्षात घेता मंत्री महोदय उपस्थित नसून त्यांच्या कार्यरकर्ते नी शेतकऱ्यांना दुप्पटा व श्रीफळ देण्यात आले .
यावेळी कांग्रेस नगरसेवक सुनील चाफेकर, निलेश पटे,लक्ष्मीकांत दिवटे,व्यापारी संघाचे माजी अध्यक्ष मदन पाटील, कै।रामगणेश गडकरी महाविद्यालयाचे सचिव प्रा.मधूकर टेकाडे, डॉ.प्रा.योगेश,अतुल पाटील,रितेश पाटील,सेंट्रल बायोटेकचे संचालक प्रवीण रासेकर, तुलसीदास आवते,हर्ष कुकडकर इत्यादी ने शेतकरी बांधवांना पोळ्याच्या शुभेच्छा दिल्या…