कोरोना संक्रमणाची वाढती संख्या रोखण्याकरिता सावनेरला जनता कर्फु का नाही?
विजय पांडे
मुख्य संपादक
सावनेर : – शहर व परिसरात कोरोना रूग्णाची संख्या दिवसेंदिवस वाढत असुन रूग्णांचे मुत्यु सुध्दा होत असल्याने नागरिकात भितीचे वातावरण निर्माण होत कोरोना रूग्णाची वाढती संख्या रोखण्याकरिता सावनेर शहरात आठ ते दहा दिवसाचा जनता कर्फु का नाही ? अशी सर्वसामान्य सुजान नागरिकांत चर्चा हळुहळु जोर धरू लागली आहे.
सावनेर शहर व परिसरात कोरोना चा संसर्ग वाढत असुनही तहसिल प्रशासन , नगरपरिषद प्रशासन, आरोग्य विभाग व पोलीस प्रशासन सुस्त असल्याचे चित्र सध्या दिसुन येत आहे. भाजीपाल्यांच्या दुकानात,किराणा दुकानात, बँकेसमोर, मटन मार्केट मध्ये विशेषतः गर्दी दिसुन येते. शहरात अनेक बॅक, शासकिय कार्यालये सावनेर लगत असलेली कोळसा खान(WCL) ला दररोज नागपुर व बाहेरगावची अधिकारी व कर्मचारी मंडळी ये-जा करित नियमाची सरास पायमल्ली होत असल्याचे निर्दनास दिसत आहे. कोरोनाची कसलीही भीती न बाळगता व सामाजिक अंतराचे भान न ठेवता गर्दी करने नित्याचेच झाले आहे. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी खबरदारी घेण्या ऐवजी बेजबाबदार नागरिक , काही व्यापारी बाजारात नियमाचे उल्लंघन करीत आहेत. यामुळे कोरोना आटोक्यात कसा येईल असा प्रश्न सर्वसामान्य माणसाला पडला असुन, कोरोना कधी कोणाचे दार ठोठावेल याचा नेम राहिला नाही. प्रशासनाने भाकीत वर्तविल्या प्रमाणे सप्टेंबर महिना कोरोनाच्या दृष्टीने सर्वाधिक घातक ठरत आहे. मृत्यृ व रुग्ण संख्या वाढीमुळे दिवसेंदिवस कोरोनाचा विळखा घट्ट होत असल्याने नागरिकांच्या बाजारात बिनधास्त फिरण्यावर आणि वाढती कोरोना रूग्णाची साखळी तोडण्याकरिता आता संपुर्ण टाळेबंदी (जनता कर्फु) हाच उपाय असल्याची चर्चा हळुहळु जोर धरू लागली आहे.
मार्च महिन्यात संपुर्ण देशात टाळेबंदी लागल्या नंतर सावनेर मध्ये व परिसरात सावनेरच्या पोलिस प्रशासनाने काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न केला तो काही प्रमाणात यशस्विसुद्या झाला. परंतु टाळे बंदी शिथिल होताच गर्दीकडे त्यांचे दुर्लक्षच होताना दिसते.
सावनेर नगर परिषद प्रशासनही लॉऊड स्पीकर गावात फिरवुन नागरिकांना व व्यापाऱ्यांना सुचना देत आपले अस्तित्व असल्याची जाणीव करून दिल्या शिवाय फारसे काही करतांना दिसत नाही. व्यापाऱ्यांचे तोंडें व राजकिय पत पाहुन दंड करण्याचे वा त्यांच्या कडे दुर्लक्ष करण्याचा प्रकार घडत असल्याची चर्चा आहे. नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांना दंड ठोठावुन वचक निर्माण करण्याची आवश्यकता असताना सावनेर नगरपरिषद प्रशासन व पोलीस प्रशासन सुस्तावल्याचे चित्र सध्या दिसत आहे. स्थानिक तहसिल प्रशासन, नगरपरिषद प्रशासन,पोलिस प्रशासन ऐकमेकांनवर तशारे ओढण्याचे चित्र ही दिसुन येत आहे. येथील नगरसेवकांनी जरी आपआपल्या प्रभागात लक्ष देत नागरिकांत जनजागृती व अधिका-यांना कोरोना संदर्भातील सर्व कामे नियमित व वेळेवर करण्यास भाग पाडण्यास कमी पडत असल्याचे नागरिकांना जानवत आहे. कोरोना चा वाढता प्रादुर्भावाने सर्व सामान्य नागरिकात भितीचे वातावरण निर्माण होत असुन सावनेरला वाढती कोरोना रूग्णाची साखळी तोडण्याकरिता सृद नागरिकांनाच व व्यापारी संघाला सामोरा घेऊन कमीत कमी आठ ते दहा दिवसाचा जनता कर्फु (लॉकडाऊन ) करण्याची सर्वसामान्याच्या चर्चा जोर धरू लागल्या आहे.